One lakh voters in Rahuri for Gram Panchayat elections 
अहिल्यानगर

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राहुरीत एक लाख मतदार

विलास कुलकर्णी

राहुरी : तालुक्‍यातील 44 ग्रामपंचायतींमध्ये 150 प्रभागांतून 418 सदस्य निवडून द्यायचे आहेत. या ग्रामपंचायतींच्या अंतीम मतदार यादीत पुरुष 49,498 व महिला 44,709 असे एकूण 94,207 मतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी 167 मतदान केंद्र आहेत. आज (बुधवारी) अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी अशी एकही उमेदवारी अर्ज आला नाही, अशी माहिती तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी दिली. 

तहसीलदार शेख म्हणाले, की "राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारhttps://Panchayatelection.maharashtra.gov. in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे आवश्‍यक आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रासोबत जात पडताळणी पोहोच व हमीपत्र सादर करणे आवश्‍यक आहे.

23 ते 30 डिसेंबर दरम्यान (25 ते 27 दरम्यान सार्वजनिक सुट्ट्या वगळून) राहुरी तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांचे समक्ष नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत. (31 डिसेंबर) रोजी सकाळी 11 वाजता नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल.

चार जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप केले जाईल. (15 जानेवारी) रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल. (18 जानेवारी) रोजी मतदान होईल, असेही तहसीलदार शेख यांनी सांगितले. अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT