crime sakal media
अहिल्यानगर

प्रेमप्रकरणातून श्रीरामपुरात गोळीबार; एक जण जखमी

सकाळ डिजिटल टीम

श्रीरामपूर (जि. नगर) : शहरातील सूतगिरणी परिसरात काल (सोमवारी) रात्री प्रेमप्रकरणातून एकावर गोळीबार करण्यात आला. त्यात शुभम जावळकर हा तरुण किरकोळ जखमी झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अंधाराचा फायदा घेत आरोपी व त्याचा साथीदार पसार झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी आज चौकशीसाठी एकाला ताब्यात घेतले.

शुभम हा खासगी वाहनावर चालक आहे. काल (ता. २६) रात्री तो शेवगाव येथील भाडे घेऊन शहरात आला. मालकाने त्याला त्याच्या घराच्या परिसरात सोडले. तो घरी जात असताना, शुभम यादव याने आणखी एका साथीदारासह दुचाकीवर येऊन गोळी झाडली. त्यात शुभमला किरकोळ दुखापत झाली. शुभमच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी शुभम यादव व त्याच्या आणखी एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शहरात शोध घेऊन यादवला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी दिली.

(One person was slightly injured in the firing at Shrirampur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panchgani Gas Shortage: पाचगणीत पर्यटन व्यवसायाला गॅस टंचाईची ‘झळ’;हॉटेलमध्ये पेटल्या चुली; पर्यटकांना सेवा देतानाही मोठी कसरत

Nagpur News: इम्प्रेस मॉलवरून उडी घेत विद्यार्थ्याने संपवले जीवन; शनिवारपासून होता बेपत्ता, विषही केले प्राशन

Ramwadi–Wagholi Metro: रामवाडी - वाघोली मेट्रो मार्ग, सरकारी विभागांची संयुक्त पाहणी, अडचणी व उपाययोजना बाबत चर्चा, ३ वर्षात प्रकल्प पूर्ण होणार

निवडणूक जाहीर होण्याआधी ममतांची 'खेळी', आयोगाच्या पत्रकार परिषदेआधी केली मोठी घोषणा

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नावे चक्क पिवळं रेशनकार्ड, अज्ञातावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT