Onion auction in Rahuri tomorrow but today the market committee is full 
अहिल्यानगर

राहुरीत कांदा लिलाव उद्या, पण आजच बाजार समिती फुल्ल

विलास कुलकर्णी

राहुरी : येथील बाजार समिती समोरील नगर-मनमाड महामार्गावर शेतकऱ्यांच्या कांद्याच्या वाहनांची राहुरी खुर्द पर्यंत दीड किलोमीटर रांग लागली.

उद्या (शुक्रवारी) बाजार समितीत कांद्याचा लिलाव होणार आहे. त्यासाठी आज (गुरुवारी) या वर्षातील उच्चांकी 61 हजार कांदा गोण्यांची आवक झाली.

सकाळी सात वाजल्यापासून कांद्याची वाहने दाखल होण्यास सुरुवात झाली. राहुरी, वैजापूर, संगमनेर, अकोले, नगर तालुका, श्रीरामपूर, राहाता, नेवासे तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला.

बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी बाजार समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांना तैनात केले. बाजार समितीचे सचिव प्रकाश डुक्रे यांच्या देखरेखीखाली वाहनांच्या रांगा लावून, चालकांना नंबर देण्यात आले.

प्रवेशद्वाराजवळ वाहन चालक व शेतकऱ्यांना सॅनीटायझर देवून, थर्मल गनद्वारे शरीराचे तापमान मोजण्यात आले. त्याची नोंद रजिस्टरला ठेवण्यात आली. 

कांद्याचे वजन करून, कांदापट्टी शेतकऱ्यांना देण्यात आली. सेल हॉलमध्ये कांदा गोण्या खाली करून, वाहने रिकामी करण्यात आली. उद्या (शुक्रवारी) कांद्याचा लिलाव होणार आहे. आंध्रप्रदेश, नगर, श्रीरामपूर, वांबोरी, घोडेगाव येथील व्यापारी कांदा खरेदी करतात. लिलावानंतर तात्काळ शेतकऱ्यांना कांद्याची बिले ऑनलाइन, आरटीजीएसने किंवा धनादेशाद्वारे अदा केली जातात.

कांदा गोण्यांची आदल्या दिवशी वजन झाल्यामुळे शेतकरी निर्धास्त होतात. लिलाव झाल्यावर तात्काळ पेमेंट होत असल्याने, राहुरी बाजार समितीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. भाव वाढतील. या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांदा चाळीत भरला. परंतु, सततच्या पावसामुळे चाळीतील कांदा सडण्याचे प्रमाण वाढले आहे.

कोरोनामुळे भाववाढीची शक्‍यता मावळली. परिणामी, शेतकऱ्यांनी कांदाचाळी फोडण्यास सुरुवात केली. आज राहुरी बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक झाली आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT