The onion kept in the school, high school in Chimbhale sub-market 
अहिल्यानगर

चिंभळे उपबाजारात आवक वाढल्याने कांदा ठेवला शाळा, हायस्कूलमध्ये

संजय आ. काटे

श्रीगोंदे : बाजार समितीचा उपबाजार असणाऱ्या चिंभळे येथे कांदा लिलावात व्यापारी व शेतकऱ्यांची चांगलीच परवड झाली. काल पावसाने कांदा गोणी व्यापाऱ्यांना बाहेर काढता आल्या नाहीत. त्यातच आज पुन्हा मोठी आवक झाल्याने कांदा ठेवण्यासाठी पुरेशी सुविधाच नव्हती.

पर्यायाने शेजारील प्राथमिक व इंग्रजी माध्ययांच्या शाळांच्या खोल्यात कांदा ठेवावा लागला. 

चिंभळे येथील उपबाजारात काही दिवसात कांद्याला चांगला दर मिळतोय. त्यातच लूजसह व गोणी कांदा लिलाव होत असल्याने शेतकऱ्यांचा ओढा या उपबाजारात वाढला आहे.

काल तेथे सुमारे सहा हजार गोणींचा आवक झाली. आज जास्तीचा कांदा येणार नसल्याचा समिती व्यवस्थापनाचा अंदाज चुकला. त्यातच काल पावसामुळे घेतलेला कांदा व्यापाऱ्यांना तेथून बाहेर काढता आला नाही. त्यातच आज अडीच हजार गोणींपेक्षा जास्त कांदा आला.

तो उतरवून घेण्यासाठी उपबाजारात जागाच नव्हती. त्यामुळे अनेक तास कांदा घेवून आलेली वहाने रस्त्यात उभी राहिली. बाजार समितीचे सचिव अथवा सभापती, संचालक यांचे या उपबाजाराकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. 


अपेक्षेपेक्षा जास्त कांदा आवक झाली. त्यातच काल पाऊस झाल्याने व्यापाऱ्यांना घेतलेला पहिला कांदा बाहेर काढता आला नाही. यापुढे असे होणार नाही याची दक्षता घेतली जात असून नवे बांधकाम केले जाईल. 
-संजय जामदार, सभापती बाजार समिती. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT