Nilesh Lanke  esakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : कांद्याचे कोसळलेले भाव, दूध दर कपातीच्या निषेधार्थ नीलेश लंकेंच्या नेतृत्वाखाली आंदोलनस्‍थळी थापल्या भाकरी

कांद्याचे कोसळलेले भाव, तसेच दूध दरात झालेल्या कपातीच्या निषेधार्थ खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.५) शेतकरी जनआक्रोश आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : कांद्याचे कोसळलेले भाव, तसेच दूध दरात झालेल्या कपातीच्या निषेधार्थ खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.५) शेतकरी जनआक्रोश आंदोलन सुरू केले आहे. दुसऱ्या दिवशी शनिवारी तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच होते. आंदोलनस्‍थळी भाकरी थापून तेथेच आंदोलकांनी जेवण केले.

शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात जनावरे बांधली आहेत. चुली पेटवून जेवण करत असल्याने आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. राज्यातील शेतकरी संघटनांचे नेते तथा महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणार आहेत. गाई, म्हैस व बैलगाड्यांसह लोक आंदोलनात सहभागी झाले.

राज्य शासनाच्या निषेधाचे फलक घेऊन घोषणाही देत होते. जनआक्रोश आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकऱ्यांची भाषणे झाली, कीर्तन, त्यानंतर गोंधळी गीतांचा कार्यक्रम झाला. कालपासून सुरू झालेल्‍या या आंदोलनाने व्यापक स्‍वरूप घेतले आहे. आंदोलनात महाविकास आघाडीचे राजेंद्र फाळके, बाबासाहेब भोस, महादेव राळेभात आदी सहभागी झाले होते.

काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल मांडत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने भाकरी भाजल्या, लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी देखील महिलांसह जेवण बनवले. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी (ता.७) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, खासदार बजरंग सोनवणे येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT