Onion shopping center to be started in Karjat-Jamkhed in four days 
अहिल्यानगर

कर्जत-जामखेडला नाही होणार कांद्याचा वांदा...चार दिवसांत सुरू होणार खरेदी केंद्र

वसंत सानप

जामखेड ः मतदारसंघातील कर्जत व जामखेड तालुक्यात शेतकऱ्यांसाठी कांदा खरेदी केंद्र सुरू होणार आहेत. आमदार रोहित पवार यांनी नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतली.

या बैठकीसाठी 'नाफेड ' आणि 'महा-एफपीसी'  या नामांकित कंपन्यांचे प्रमुख अधिकारी,
यापुर्वी जे कांदा खरेदी केंद्र होते त्यांचेही अधिकारी,
कर्जत-जामखेड दोन्ही  तालुक्याचे क्रुषि अधिकारी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंमध्ये  सहभागी होते, अशी माहिती आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयातून सोशल मीडियाद्वारे देण्यात आली.

तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. पुढील चार दिवसांमध्येच ही केंद्रे सुरू होणार आहेत. शेतकऱ्यांना कांदा विक्रीसाठी पर्याय मिळावा, कांदा विक्रीची समस्या निर्माण होऊ नये, भाववाढीनंतर कांद्याचे भाव संतुलित असावेत, कोणत्याही शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, या बाबींचा विचार करुन शेतकऱ्यांच्या द्रुष्टीने हे पाऊल टाकले असल्याचे सांगितले आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत विविध मुद्द्यावर चर्चा झाली.या पूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची राहिलेली रक्कमही अदा केली जाणार आहे. शेतकऱ्यांकडे असणारा कांदा माल बांधावर खरेदी करून त्याची या भागातच साठवणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला कांदा बाजारपेठेत नेण्याच्या खर्चाबरोबरच बाजारपेठेतील इतर खर्चालाही आळा बसणार आहे.

याकरिता शेतकऱ्यांच्याच कांदाचाळी भाडे तत्वावर संबंधित कंपन्यांकडुन घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे याचाही शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होणार आहे. 'नाफेड' या कंपनीच्या मार्गदर्शनाखालीच ही कांदा खरेदी केंद्रे चालवली जाणार आहेत. कांद्याच्या पुर्ण उत्पादनापैकी काही टक्केवारी या केंद्राच्या माध्यमातुन घेतली जाणार आहे.

मतदारसंघात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र, बाजारभाव अनियमितता, वाहतूक आदीमुळे अनेकवेळा शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतो. त्यामुळे कांदा पीक हे जुगार म्हणुनच घेण्याचा शेतकऱ्यांचा कल निर्माण झाला आहे. मात्र नाफेडच्या खरेदी केंद्राने कांदा उत्पादकांना योग्य न्याय मिळणार आहे, असल्याचे आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयाकडून सोशल मीडियाद्वारे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT