Online loans are a headache 
अहिल्यानगर

ऑनलाइन कर्ज ठरतेय डोकेदुखी

नातेवाईक-मित्रांना फोन, मेसेज करून कर्जदाराची बदनामी

गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर - पाच ते पन्नास हजार रुपयांपर्यंतचे कर्ज तत्काळ देणाऱ्या बँका, मल्टिस्टेट आणि बिगर बँक प्री-पेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआर) कंपन्या कार्यरत आहेत. तत्काळ अवघ्या काही मिनिटांमध्ये कर्ज मिळत असल्याने, अनेक जण हे कर्ज घेतात. वसुलीचा प्रकार त्रासदायक असल्याने, तसेच फसवणुकीमुळे हा प्रकार डोकेदुखी ठरत आहे.

या कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी नातेवाइकांना फोन करणे, फोटो मॉर्फिंग करून त्रास देणे, असे गैरप्रकार करून अवाच्या सव्वा कर्ज वसूल केले जाते. हे प्रकार जिल्ह्यात वाढत असल्याने, त्यापासून सावध राहण्याचा इशारा पोलिस प्रशासन देत आहे.

फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावर अल्पावधीत कर्जाबाबत विविध जाहिराती येत असतात. त्यामध्ये फसवणूक करणाऱ्यांकडून गुगल प्ले स्टोअरवरून एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगतात. ॲप डाऊनलोड केल्यानंतर आपल्याकडून आपल्या मोबाईलमधील फोन बुक, फोटो गॅलरी, लोकेशन आदींसह सर्व माहितीचे ॲक्सेस घेतले जातात. केवळ आधार कार्ड व मोबाईल क्रमांकावरील ओटीपीवरून तत्काळ पाच ते पन्नास हजारांपर्यंत कर्ज प्राप्त होते.

नागरिक घेतलेले कर्ज फेडतात; परंतु फसवणूक करणारे पुन्हा फोन करून अधिक पैशांची मागणी करतात. शिवीगाळ, दमदाटी केली जाते. त्यानंतरसुद्धा पैसे न भरल्यास आपल्या फोनबुकमधील सुरक्षित (सेव्ह) असलेल्या नातेवाईक व मित्रांना फोन, मेसेज करून कर्ज घेणाऱ्यांची बदनामी केले जाते. त्यानंतरसुद्धा पैसे न भरल्यास फोटो गॅलरीमधील कुटुंबांतील महिलांचे फोटो अश्लील मॉर्फिंग करून फोनमध्ये सेव्ह असलेल्या नातेवाइकांना पाठविले जातात किंवा दिल्ली पोलिसमधून बोलत असल्याचे सांगून दमदाटी केली जाते. या सर्व प्रकाराला घाबरून अनेक नागरिक कर्जापेक्षा अधिक पैसे भरतात. नागरिकांची आर्थिक फसवणूक तर होतेच; पण खूप मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागतो.

रिझर्व्ह बँकेकडून यादी जाहीर

आर्थिक क्षेत्रातील नामांकित बँका, फायनान्स कंपन्यांच्या नावाशी साधर्म्य साधून फसव्या कर्ज ॲपची तयार करण्यात आले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर फसव्या कर्ज ॲपची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Arunachal Pradesh and China : ‘’अरुणाचल प्रदेश हा भारताचा अभिन्न अन् अविभाज्य भाग’’ ; भारताने चीनला कडक शब्दांत सुनावलं!

Suryakumar Yadav Prediction : ‘T20 World Cup 2026’चं शेड्यूल जाहीर होताच, कॅप्टन सूर्याने थेट फायनल मॅचबाबत केलं भाकीत!

Supriya Sule: बिनविरोध निवडणुकांवर सुप्रिया सुळेंचा 'आक्षेप'; राज्य निवडणूक आयोगाला लिहिलं पत्र

Pune University :पुणे विद्यापीठात बिबट्या वावराच्या चर्चा; सूर्यास्तानंतर बाहेर पडू नका; विद्यापीठाचे आवाहन!

Mumbai Crime: पाच वर्षांच्या चिमुकलीचा ५० हजारांत सौदा! मुंबईतल्या वाकोला पोलिसांनी केला रॅकेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT