leaders of farmers' associations 
अहिल्यानगर

१ ऑगस्टपासून राज्यात दुध उत्पादकांचा दुध बंद एल्गार शेतकरी नेते अनिल देठे यांची माहिती... 

अजित सोनावळे

टाकळी ढोकेश्वर (नगर):  दुध दराबाबत राज्यातील व शेतकरी नेते व  राज्याचे दुग्ध विकास मंत्री सुनिल केदार व राज्यमंत्री दत्तात्रय भारणे यांच्यात बैठक होऊन चार दिवस उलटून गेले तरी राज्य सरकारच्या वतीने काहिच हालचाल होताना दिसत नसल्याने अखेर (ता.२५) जुलै रोजी राज्यातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांची ऑनलाईन बैठक पार पडली. यामध्ये १ ऑगस्टपासून राज्यात दुध उत्पादकांचा दुध बंद एल्गार आंदोलन सुरू होणार असल्याची माहीती शेतकरी नेते अनिल देठे यांनी दिली. 

देठे म्हणाले, दुधाचे खरेदी दर प्रतिलीटर ३२ रूपयांवरून १७ ते १८ रूपयांपर्यंत घसरलेले आहेत. व या दरात शेतकऱ्यांना दुधाचा उत्पादन खर्च देखील मिळत नसल्याने दुध उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या संदर्भात शेतकरी नेते अनिल देठे यांच्यासह राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पञ पाठवून दुधाला प्रतिलीटर ३० रूपये दर किंवा प्रतिलिटर १० रूपये अनुदान देण्याची तसेच दुधभुकटिला निर्यातीवर ५० रूपये प्रति किलो अनुदान  देण्याची मागणी केली होती, त्या अनुषंगाने राज्य सरकारच्या वतीने दुग्ध विकास मंत्री सुनिल केदार व राज्यमंञी दत्ताञय भरणे यांनी २१ जुलै रोजी राज्यातील प्रमुख शेतकरी नेत्यांशी ऑनलाईन बैठक घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले व लवकरच राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी याबाबत विस्तृत चर्चा करून दुध उत्पादक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल अशी योजना आम्ही आणु असे आश्र्वासन दिले.

तथापि बैठक होऊन चार दिवस उलटून गेले तरी राज्य सरकारच्या वतीने काहीच हालचाल होताना दिसत नसल्याने अखेर २५ जुलै रोजी राज्यातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले, शेतकरी नेते तथा राज्य सुकाणू समिती सदस्य अनिल देठे, रोहिदास धुमाळ, धनंजय धोरडे, महेश नवले, सुरेश नवले, डॉ. संदिप कडलग, उमेश देशमुख, माउली हळवणकर आदी नेत्यांनी सहभाग घेतला. सदर बैठकीत १ ऑगस्टपासून राज्यात दुध उत्पादकांचा दुध बंद एल्गार आंदोलन करण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले.

१ ऑगस्ट रोजी राज्यातील दुध उत्पादक शेतकरी आपलं दुध कुठल्याही दुध संस्थेस, संघास देणार नाहीत. त्या दुधाचा आपापल्या गावातील चावडीवर सामुहीकरित्या स्वयंमशिस्त पाळुन व सामाजिक अंतर ठेवून दुग्धाभिषेक आंदोलन करतील. तसेच समाजातील गरजु लोकांना मोफत दुध वाटप देखील करतील. तसेच २ ऑगस्ट रोजी राज्यातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची पुन्हा ऑनलाईन बैठक होईल.व त्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. असे देठे यांनी माहिती देत असताना सांगितले. व अहमदनगर जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

संपादक- सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणेकरांनो, इंधन तुटवडा नाही, गर्दी करू नका! पेट्रोल डीलर्स असोसिएशनचं आवाहन; राज्य सरकारनेही खरेदीबाबत दिले मोठे अपडेट

Railway News: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! रेल्वे ट्रॅकखाली १२ तासांत सबवे उभारणार; ग्रामीण भागासाठी ‘गेमचेंजर’ योजना

मी शंकर, तू माझी पार्वती! स्वयंघोषित धर्मगुरूचा पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार; पीडितेचे गंभीर आरोप

Gas Cylinder Shortage : हॉटेलांसह अनेक चहा-वडापाव स्टॉलही बंद; व्यावसायिक सिलिंडर पुरवठा ठप्प, लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांची कोंडी

Sangola Crime : हरवलेल्या १०० महिलांचा लावला शोध; सांगोला पोलिसांची कामगिरी, दहा मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

SCROLL FOR NEXT