Owner fights leopard to save dog humanity animal protection kopargaon  Esakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : कुत्र्याला वाचविण्यासाठी मालकाची बिबट्याशी झुंज

कोपरगाव तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव : तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली आहे. आतातर बिबटे चक्क माणसांवर हल्ले करत आहेत. धामोरी येथील गंगाधर वाळीबा ठाकरे (वय ७०) यांनी आपल्या पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी थेट बिबट्याशी झुंज घेतली. त्यात शेतकरी गंभीर जखमी झाला.

या घटनेची माहिती अशी की, आज पहाटे पावणेतीनला गंगाधर ठाकरे यांच्या खोकडमळा शिवारातील वस्तीवर गोठ्यातील गायी हंबरू लागल्या. सोबतच कुत्र्याचाही आवाज येत असल्याने ठाकरे घराबाहेर आले.

बाहेर बिबट्याची त्यांच्या कुत्र्याशी हल्ला करुन झटाटप सुरू होती. ठाकरे यांनी लोखंडी पाईप घेऊन कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी बिबट्याने कुत्र्याला सोडून ठाकरे यांच्यावर हल्ला केला. ठाकरे व बिबट्यात झुंज सुरू झाली.

बिबट्याने ठाकरे यांची मान पकडण्याच्या प्रयत्नात त्यांच्या डाव्या कानाचे, डाव्या हाताच्या काखेचे, कोपराचे लचके तोडले. तरीही ठाकरे यांची मान जबड्यात सापडत नसल्याने चवताळलेल्या बिबट्याने ठाकरे यांचे डोके जबड्यात धरून ओढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याचे सुळे ठाकरे यांच्या डोक्यात आरपार गेले.

जखमी झालेल्या ठाकरे यांचा किंचाळण्याचा आवाज त्यांच्या पत्नी कुसुमबाई ठाकरे यांच्या कानी पडताच त्यांनी बॅटरी लावून आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यांच्या सोबत नातू ज्ञानेश्वर ठाकरे हेही होते. बॅटरीच्या प्रखर प्रकाशाने घाबरलेला बिबट्या तेथून पळून गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krishna River Pollution : कृष्णा नदीसह शेरीनाल्यात फेकल्या मेलेल्या कोंबड्या, सांगलीकरांच्या आरोग्याशी खेळ; रात्री दहा ते बारादरम्यान 'स्टिंग ऑपरेशन'

Marathi News Live Updates : काल, आज आणि उद्याही शिवसेना ठाकरेंचीच असेल; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे?

JPSC-JSSC घोटाळ्याचा तपास वेगात; दिल्लीतून ISN संचालकाला अटक, ८०० OMR शीटची पडताळणी सुरू

धक्कादायक! उद्यापासून IND vs SL कसोटी मॅच अन् त्यापूर्वी खेळाडूंच्या मारहाणीत श्रीलंकेतील क्रिकेट प्रशिक्षकाचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

'अरे मनमोहना...' फेम आशा काळे आठवतात का? अनेक वर्षांनी आल्या कॅमेरासमोर; अभिनेत्रीला पाहून नेटकरी भारावले

SCROLL FOR NEXT