Oxygen Sakal
अहिल्यानगर

सावेडी कचरा डेपोत ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प

अमित आवारी

नगर : महापालिकेतर्फे सावेडी कचरा डेपोत हवेपासून ऑक्सिजननिर्मितीचा प्रकल्प उभारला जाणार आहे. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार आवश्यक विषय म्हणून स्थायी समितीची काल (शुक्रवारी) विशेष सभा घेण्यात आली. तीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. याद्वारे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये याची तयारी सुरू केली आहे.

स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी स्थायी समितीची ऑनलाइन सभा बोलावली होती. महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी विशेष बाब म्हणून स्थायी समितीची सभा घेण्याचे निर्देश काल दिले होते. त्यामुळे एकाच दिवशी स्थायी समितीच्या सलग दोन सभा झाल्या. यावेळी ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली. प्रकल्पाद्वारे रोज सात मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण होणार आहे. प्रकल्पउभारणीसाठी दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत. (Oxygen Generation Project at Sawedi Waste Depot)

या वेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी शहरातील रुग्णालयांत ऑक्सिजन तुटवडा जाणवलाच, तर ऑक्सिजन वाटपाचे अधिकार महापालिका प्रशासनाकडे राखून ठेवण्याची सूचना मांडली. रवींद्र बारस्कर यांनी कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीच प्लँट सुरू होईल, अशा पद्धतीने तयारी करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावर प्रकल्पाचे प्रमुख राजेंद्र मेहत्रे यांनी, २५ दिवसांत प्रकल्प उभा राहणार असल्याची माहिती दिली.

घुले यांनी शहरातील अनेक प्रकल्प वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. अधिकाऱ्यांनी ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात अडथळे आणू नयेत. प्रकल्पाची निविदा काढताना प्लँटवर महापालिकेचा अंकुश राहील अशा पद्धतीने तयार करावी. प्रकल्पउभारणी कामाचा दैनंदिन अहवाल स्थायी समितीला सादर करावा, अशा सूचना केल्या. नालेसफाईच्या कामासंदर्भात डॉ. सागर बोरुडे यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर सुरू असलेल्या कामाची माहिती घनकचरा विभागप्रमुख शंकर शेडाळे यांनी दिली.

नगरसेवकांना मिळेना अधिकाऱ्यांकडून माहिती

शहरातील अनेक प्रकल्पांसंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून स्थायी समितीसह नगरसेवकांना माहिती दिली जात नाही, असा आरोप नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी केला. त्यावर सभापती अविनाश घुले यांनी नाराजी व्यक्त केली, तसेच मागितलेली माहिती न दिल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.

(Oxygen Generation Project at Sawedi Waste Depot)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Takes Oath as Bihar Chief Minister : नितीशकुमार दहाव्यांदा झाले बिहारचे मुख्यमंत्री; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत घेतली शपथ!

Shraddha Bhosale : कुटुंब मूळचे गुजरातचे, जन्म मुंबईत, शिक्षण अमेरिकेत अन् सासर कोकणात; कोण आहेत श्रद्धा सावंत भोसले? भाजपनं दिलीय उमेदवारी

‘कसाब बिर्याणी मागतोय’ हा ‘माझाच फंडा’! खासदार ॲड. उज्ज्वल निकम; प्रकट मुलाखतीत उलगडले अनेक किस्से..

Latest Marathi News Update LIVE : बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशराज! पाटण्यात ऐतिहासिक शपथविधी सोहळा

Pune Patient Missing: खळबळजनक घटना! दोन महिन्यांपूर्वी ICU मध्ये दाखल केल अन्... भाजप नेत्याचे सासरे ससून रुग्णालयातून गायब?

SCROLL FOR NEXT