oxygen machines Esakal
अहिल्यानगर

कामी आली पवार पॉवर ः आरोळेंच्या कोविड सेंटरला मोफत अॉक्सीजन

आमदार रोहित पवार यांनी केला पाठपुरावा

सकाळ डिजिटल टीम

जामखेड : जामखेड ग्रामीण आरोग्य प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कोविड सेंटरला शासनाकडून विनाशुल्क ऑक्‍सिजन पुरवठा करण्यासंदर्भात निर्णय निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांनी घेतला. या निर्णयामुळे कोविड सेंटरची सर्वांत मोठी अडचण दूर झाली. यासाठी आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा केला होता.

जामखेडचे कोविड सेंटर शासनस्तरावरुन हस्तांतर करण्यात आल्यानंतर मागील वर्षभरापासून सेंटरचे प्रमुख रवी आरोळे हेच मोठ्या प्रमाणात खर्चाचा भार उचलित होते. दररोज तब्बल दीड लाखाहून अधिक रुपये खर्च होत होते. त्यातील सर्वाधिक पैसे ऑक्‍सिजन पुरवठ्यावरच खर्च व्हायचे. याची माहिती समजल्यानंतर नागरिकांनी या कोविड सेंटरला हातभार लावला. मात्र, खर्चाचा भार व मिळणारी मदत, यामध्ये मोठी तफावत होती. व्यवस्थापनाने प्रकल्पाची सुरक्षा ठेव व "स्थावर मालमत्ता रुग्णांच्या मोफत खर्चासाठी वापरली. आमदार रोहित पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनीही मदत पुरविली.

विविध संघटना, राजकीय पक्ष, नागरिकांची आजही मदत सुरू आहे. आमदार पवारांनी येथील बेडची संख्या आणि दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या पाहून येथे जम्बो कोविड सेंटर उभारलंय. त्यामुळे याठिकाणी आज तब्बल साडेसहाशे रुग्ण उपचार घेत आहेत. प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, आमदार पवारांचा पाठपुरावा यामुळे या सेंटरसाठी ऑक्‍सिजन विनामूल्य पुरविण्यासंदर्भात निर्णय झाला.

"आई-वडिलांची इच्छा होती विनामूल्य रुग्ण सेवेचे व्रत कायम जपावे; त्याच धर्तीवर आपण काम करीत आहोत. या महामारीत येथील माणसे वाचली पाहिजेत, जगली पाहिजेत याकरिता वाटेल ती किंमत चुकविण्याची वेळ आली, तरी आपण मागे हटणार नाही.

-डॉ. रवी आरोळे, संचालक, ग्रामीण आरोग्य प्रकल्प

बातमीदार - वसंत सानप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

IPL 2026: 'रोहित शर्मा डगआऊटमधून २० ओव्हर पाहू शकत नाही, त्याला...', माजी क्रिकेटरचा मुंबई इंडियन्सला स्पष्ट सल्ला

Gudhipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : पुण्यात पिरंगुट घाटात कार दरीत कोसळली

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT