Pachpute's appeal to find the mastermind of the ransom 
अहिल्यानगर

गृहमंत्र्यांना ओळखतो, ते असे वागतील असे वाटत नव्हतं; मास्टरमाईंड वेगळाच! पाचपुतेंचा रोख कोणाकडे

संजय आ. काटे

श्रीगोंदे : गृहमंत्री अनिल देशमुख यांना मी ओळखतो, ते असे वागतील असे वाटत नव्हते. मंत्रीच पैसे मागू लागले, तर इतरांना काय नावे ठेवणार, असा सवाल करीत भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांनी शंभर कोटी रुपयांच्या कथीत खंडणीचा मास्टरमाईंड कोण, याची चौकशी करण्याची मागणी केली. 

खंडणीचा आरोप झालेल्या गृहमंत्री देशमुख यांनी राजीनामा द्यावा, तसेच केंद्राने हस्तक्षेप करीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागण्यांसाठी भाजपतर्फे नुकतेच तहसील कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.

त्यावेळी बोलताना पाचपुते म्हणाले, ""सरकार चालवून लोकांची सेवा करण्यापेक्षा गल्लाभरू राजकारण मंत्र्यांनी सुरू केले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असणारी मोटर उभी केली जाते. ज्याने उभी केली, त्यालाच तपास दिला जातो. अंबानी यांच्याकडून कोट्यवधीची खंडणी वसूल करण्यासाठी ही मोटर लावली गेली होती.'' 

गृहमंत्री देशमुख यांना आपण अनेक वर्षांपासून ओळखतो, ते असे करतील अशी अपेक्षा नव्हती. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अंबानी यांच्या घरापुढील मोटारीमागे नेमके कोण आहे, असा प्रश्न उपस्थित केला. तसाच या शंभर कोटींच्या मागणीमागील मास्टरमाईंड शोधण्याची गरज आहे. त्यासाठी देशमुख यांनी राजीनामा द्यावा व केंद्राने राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी, अशी मागणी पाचपुते यांनी केली. 

आपल्यावर एकही आरोप नाही 
पाचपुते म्हणाले, की आपण 40 वर्षे राजकारणात आहोत. या काळात अनेक मंत्रिपदे सांभाळली. त्यात गृह राज्यमंत्रीही राहिलो; पण आपल्यावर एकही आरोप झाला नाही. मात्र, या सरकारमधील मंत्र्यांवर आरोपांचे सत्र सुरू आहे. देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी झाली पाहिजे. शिवाय कोरोना काळात मोठा भ्रष्टाचार झाला असून, त्याचीही चौकशी करावी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT