Parking on 30 feet road in Akole taluka 
अहिल्यानगर

३० फुटी रस्ता बनला पार्किंग झोन, अपघाताचे प्रमाण वाढले

शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : तालुक्यातील राजूर येथील कोल्हार घोटी रस्त्यावर चक्क पार्किंग झोन असल्यागत जीप, ट्रक, मोटरसायकल, ट्रक्टर बिनधास्तपने लावून गप्पाचा फड रंगला जात आहे. मोठा रस्ता होऊनही वाहतुकीला अडचण निर्माण होऊन अपघात ही वाढले आहेत. 

बारी ते संगमनेर हा २२५ कोटीचा रस्ता सुरू असून या रस्त्यावर वाहन तल करून वाहतुकीला अडचण निर्माण करण्याचे काम खाजगी वाहतूकदार करत असल्याचे चित्र समोर आले आहे. पोलिस खाते व सार्वजनिक बांधकाम खाते रस्त्याच्या अडवणूक व वाहनतळ रोखण्यास असमर्थ दिसत आहे. त्यामुळे प्रवासी नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. त्यात रस्त्याच्या कडेला असलेले दुकानदार हळू हळू रस्त्यावर येऊ लागल्याने वाहतुकीची मोठी कोंडी पाहायला मिळत आहे.

सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत मोठी ट्रॅफिक कोल्हार घोटी रस्त्यावरील पेट्रोल पंप ते पिचड बंगलापर्यंत पूर्ण गर्दी असते त्यामुळे अपघात होऊन एका मोटर सायकल चालकाला आपला जीव गमवावा लागला आहे. तर मोठ्या प्रमाणात मोटर सायकल व चारचाकी वाहने रस्त्यावर उभे करून जणू पार्किंग समजून बिनधास्त पने लोक गाड्या उभा करत असल्याने वाहतूक कोलमडली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Ashok Kharat : कॅप्टन खरातकडून पंचवीस वर्षांपासून अंधश्रद्धेला खतपाणी! 'सकाळ'ने वृत्तमालिकेद्वारे भोंदूगिरीवर टाकला होता प्रकाशझोत

IPL 2026 New Rule : १५ नवीन नियम... BCCIने खेळाडू, त्यांचे कुटुंबिय अन् फ्रँचायझीची डोकेदुखी वाढवली; चुका केल्यास कठोर कारवाई

धुरंधर ते नॅशनल क्रश झालेल्या उझैर बलोचची 'ही' आहे गर्लफ्रेंड, अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट, म्हणाली...'आता दुनिया तुझ्यासाठी...'

Investment: भारतात गुंतवणुकीची क्रांती! 84% भारतीय आणि 56% महिला आता स्वतः घेतात आर्थिक निर्णय

Farsawale Baba Death: गोरक्षकांना मिळणार 'शस्त्र परवाना' आणि विशेष सुरक्षा कवच; काय आहे योगींचा गोतस्करांविरुद्ध 'सीक्रेट' मास्टरप्लॅन?

SCROLL FOR NEXT