In Parner, the administrators got into trouble 
अहिल्यानगर

पारनेरमध्ये झाला प्रशासकांचा पेच, गावगाडा चाललाय सरपंचांविना

मार्तंड बुचुडे

पारनेर ः तालुक्यातील आठ ग्रामपंचायत सरपंचपदाच्या मुदती ऑगस्टअखेरच संपल्या आहेत. मात्र न्यायालयालयीन वाद तसेच गटविकास अधिकारी रजेवर असल्याने तालुक्यातील या आठ गावातील ग्रामस्थ प्रशासक म्हणून कोण येणार याची वाट पहात आहेत.

सध्या मात्र या ग्रामपंचायतीचा कारभार सरपंचाविना सुरू आहे. तसेच या महिनाअखेर उर्वरीत 80 ग्रामपंचायतीच्या सरपंचाची मुदत संपणार आहे. लवकरच तेथेही मुदत संपताच प्रशासक येणार आहे.

तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींची मुदत ऑगस्टअखेर तर उर्वरीत 80 ग्रामपंचायतींची मुदत सप्टेंबरअखेर संपणार आहे. त्या ग्रामपंचायतीवर मुदत संपण्याच्या तारखेनंतर लगेचच प्रशासकाची नेमणुक होणार आहे. मात्र, त्या जागेवर प्रशासक सरकारी अधिकारी की ग्रामस्थ हाच खरा प्रश्न आता निर्माण झाला आहे. सध्या हा प्रश्न न्यायालयात असल्याने किमान ऑगस्टअखेर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी पदाच्या सरकारी अधिका-याचीच नेमणुक होणार आहे.

तालुक्यात 113 ग्रामपंचायती आहेत. त्या पैकी अतिशय मोठ्या संख्येने ग्रामपंचायतींच्या मुदती सप्टेंबरअखेर संपत आहे. त्या मुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पंचायत समितीत विस्तार अधिकारी उपलब्ध होणार नाहीत. परिणामी इतर खात्यातील त्या दर्जाच्या अधिका-यांची नेमणुक होण्याची शक्यता आहे. मात्र, ही बाब न्यायायाच्या निर्णयानंतरच निश्चित होणार आहे.

कारण या अगोदर सरकारी पातळीवर सरकारने एक अध्यादेश काढून पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने गटविकास अधिकारी प्रशासकांच्या नेमणुका करणार होते. मात्र ,त्यास न्यायालयात आव्हान दिल्याने ही प्रक्रिया रखडली आहे.

प्रशासक कोण नेमावा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या निर्णयाविरोधात जेष्ठ समाजेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून नाराजीही व्यक्त केली होती इतकेच नव्हे तर त्यासाठी मला कदाचित शेवटचे आंदोलन कारवे लागेल, असा इशाराही दिला होता. 
प्रशासक नेमण्याबाबतचा प्रश्नाची सुनावणी अद्याप न्यायालयात सुरू असल्याने पुर्वीच्या नियमानुसार व या महिनाअखेरीस तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या मुदती संपत असल्याने व अद्यापही न्यायालयाचा निकाल लागला नसल्याने किमान या ग्रामपंचायतीवर तरी सरकारी अधिकाऱ्यांचीच करावी लागणार आहे.

या ग्रामपंचायतींची संपली मुदत

ऑगस्टअखेर मुदत संपलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे ः डिस्कळ, पोखरी, सारोळा आडवाई ,वारणवाडी, कर्जुले हर्या, कासारे, देसवडे व म्हसोबा झाप या आठ ग्रामपंचातीची मुदत 24 ते 28 ऑगस्ट अखेर संपल्या आहे. अद्याप तेथे प्रशासकाची नियुक्ती झालेली नाही. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT