Parner Bazar Committee esakal
अहिल्यानगर

Parner Bazar Committee: बाजार समितीत सभापतिपदी वर्णी कोणाची; निलेश लंके यांच्या समोर पेच

रुपेश नामदास

पारनेर, ता. ७ : पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव करत महाविकास आघाडीने सर्वच्या सर्व १८ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळविले. या निवडणुकीत अनेक मातब्बर निवडून आल्याने आता सभापती व उपसभापती पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे पारनेरकरांचे लक्ष लागले आहे.

चुरशीची वाटणारी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक एकतर्फी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस व (शिवसेना ठाकरे) गट व काँग्रेस यांनी महाविकास अघाडी करत बाजार समितीच्या १८ पैकी १८ जागा जिंकल्या. महाविकास अघाडीचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके, शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांनी नेतृत्व करत सर्वच संचालक मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या आहेत.

त्यात १३ जागा राष्ट्रवादी काँग्रेस तर पाच जागा शिवसेनेला देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती प्रशांत गायकवाड, अशोक सावंत, पक्षाचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, माजी सभापती गंगाराम बेलकर, अर्बन बँकेचे अध्यक्ष अशोक कटारीया तर शिवसेने कडून शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष रामदास भोसले, शंकर नगरे, व डॉ. पद्मजा पठारे, डॉ. आबासाहेब खोडदे, विजय पवार असे संचालक म्हणून निवडून आले आहेत.

डॉ. पठारे या सार्वाधिक मतांनी निवडून आल्या आहेत. एक महिला म्हणून त्यांना संधी मिळणार का. वरील पैकी कोणाला संधी द्यावयाची हा निर्णय घेण्याचे काम श्रेष्ठींना कठीण होणार आहे. वरील पैकी कोणाल संधी देणार हे मात्र आमदार लंके व माजी आमदार औटी हेच ठरविणार असले तरीही अनेकांच्या इच्छा मात्र लपून राहिल्या नाहीत. आपलीच या पदावर एक वर्षासाठी का होईना वर्णी लागावी यासाठी अंतर्गत फिल्डींग लावण्यास सुरूवात झाली आहे.

अद्याप सभापती निवडीची तारीख निश्चित झाली नाही तरीसुद्धा हलाचालींना वेग आला आहे. अनुभवी संचालकांना संधी देणार की ज्येष्ठांना, की नविन लोकांना देणार हे मात्र निवडणुकी नंतरच समजणार आहे. या पुर्वी चांगल्या कामाची पावती देणार की तरुणांना हे लंके औटीच ठरविणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT