In Parner, the central bank felt a debt of Rs 2.5 crore a day 
अहिल्यानगर

सेंट्रल बँक झाली उदार ः शेतकऱ्यांना एका दिवसात वाटले अडीच कोटींचे कर्ज

मार्तंड बुचुडे

पारनेर ः_ केंद्र सरकारच्या "आत्मनिर्भर भारत' योजनेअंतर्गत सेंट्रल बॅंकेतर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात, एका दिवसात 152 शेतकऱ्यांना सुमारे दोन कोटी 52 लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले.

या शिवाय तालुक्‍यातील विविध शाखांच्या माध्यमातूनही अनेक शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले. या योजनेअंतर्गत सुमारे चार कोटी रुपयांहून अधिक रकमेचे वाटप झाल्याचे सांगण्यात आले. 

सेंट्रल बॅंक ही जिल्ह्याची अग्रणी बॅंक म्हणून कार्यरत आहे. तालुक्‍यात या बॅंकेच्या सहा शाखा आहेत. त्यांनी पारनेर येथे एकत्रित शेतकरी मेळावा घेऊन एका दिवसात शेतकऱ्यांना अडीच कोटी रुपये पीककर्जाचे वाटप केले. सरकारच्या "आत्मनिर्भर भारत' योजनेस तालुक्‍यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

शेतकऱ्यांना हे पीककर्ज अतिशय कमी व्याजदराने मिळते. शिवाय, त्याची वेळेत परतफेड केली, तर व्याजदरात मोठी सवलतही मिळते. 

कर्जवितरणप्रसंगी क्षेत्रीय व्यवस्थापक के. सत्यनारायण, क्षेत्रीय प्रबंधक एन. के. पांडा, प्रबंधक संदीप वालावलकर, पारनेरचे वरिष्ठ प्रबंधक संदीप बिरादार, सुप्याचे अशोक नागरगोजे, अळकुटीचे अल्ताफ मुलाणी आदी उपस्थित होते. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Crop Loss: निलंगा तालुक्यात खरीप पीक शंभर टक्के उद्ध्वस्त; कृषी विभागाच्या ‘७० टक्के’ अहवालावर शेतकऱ्यांचा संताप

Sahyadri Sugar Mill: सह्याद्री साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; घोषणाबाजी, गदारोळ आणि तणावपूर्ण वातावरण

Malegaon Tractor Attack Case: माळेगावात ट्रॅक्टरने जीवे मारण्याचा प्रयत्न; नरूटे कुटुंबीयांवर हल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

SCROLL FOR NEXT