Dr. Sujay Vikhe Patil sakal
अहिल्यानगर

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देणारच - डॉ. सुजय विखे पाटील

राज्याचे तीन माजी मुख्यमंत्री एका माजी मुख्यमंत्र्यांना विरोध करत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पारनेर - राज्याचे तीन माजी मुख्यमंत्री एका माजी मुख्यमंत्र्यांना विरोध करत आहेत. मात्र लक्षात ठेवा मराठा समाजाला न्याय देण्याचे काम फक्त देवेंद्र फडणवीस यांनीच केले होते. तसेच आताही महायुतीचे सरकार न्यायालयीन लढाई लढून मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहाणार नाही, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

पारनेर येथे आज भाजप कार्यालयाचे उद्‍घाटन व ‘घर चलो’ अभियानाचा प्रारंभ पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्या हस्ते व डॉ. विखे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. त्यावेळे ते बोलत होते. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, बाबासाहेब वाकळे, युवा नेते राहुल शिंदे, तालुकाध्यक्ष सुनील थोरात, सचिन वराळ, बाबासाहेब तांबे, वसंत चेडे, सुभाष दुधाडे, अमोल मैड, युवराज पठारे, ऋषी गंधाडे, अशोक चेडे, दिनेश बाबर, किरण कोकाटे, सोनाली सालके, प्रशांत औटी, विश्वास रोहकले, संभाजी आमले आदी उपस्थित होते.

डॉ. विखे म्हणाले की, जालना येथील लाठीहल्ल्याची घटना समर्थनिय नाही. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला आरक्षण देऊन न्याय देण्याचे काम केले होते. आताही महायुतीचे सरकारच मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहाणार नाही. माझा जनसंपर्क कमी असला, तरी मी गेल्या ५० वर्षांत जेवढी कामे झाली नाहीत व आगामी ५० वर्षे लोक सुखाने जगतील, अशी कामे मी केली आहेत.

सुप्याला दुय्यम निबंधक कार्यालय तसेच बसस्थानकासाठी आडीच कोटी रुपये दिले असल्याचा त्यांनी आवार्जून उल्लेख केला.

चौधरी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारत जगाचा विश्वगुरू बनला आहे. तसेच काहींची दुकानदारी बंद झाली आहे. मागील साडेनऊ वर्षांत मोदी सरकारमधील एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही. त्यांनी देशाला दहशतवाद मुक्त केला आहे. प्रास्ताविक कोरडे यांनी, तर सूत्रसंचलन सागर मैड यांनी केले.

सत्तेची अपेक्षा ही सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी असावी. आम्ही मतदासंघातील गरीब व गरजू तीनशे मुलांना दत्तक घेऊन त्यांना एमपीएससी व यूपीएससीचे मोफत मार्गदर्शन करणार आहोत. राज्यात जोपर्यंत चांगला पाऊस पाऊस पडणार नाही, तो पर्यंत सत्कार स्वीकारणार नाही.

- डॉ. सुजय विखे पाटील, खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT