Parner Sainik Bank auctioned the property even after paying the installments
Parner Sainik Bank auctioned the property even after paying the installments 
अहमदनगर

हप्ते भरूनही पारनेर सैनिक बँकेने मालमत्तेचा केला लिलाव, पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

मार्तंड बुचुडे

पारनेर ः कर्जाची परतफेड करूनही पारनेर सैनिक सहकारी बॅंकेने कर्जदाराकडे रक्कम थकीत दाखवून त्याच्या मालमत्तेचा बेकायदा लिलाव केला.

याबाबत बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी व्यवहारे, माजी अध्यक्ष अर्जुन चौधरी यांच्यासह 13 जणांविरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबत पुरुषोत्तम शहाणे (रा. सुपे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. 

फिर्यादी पुरुषोत्तम शहाणे यांचा बंधू राजेंद्र शहाणे यांनी सैनिक सहकारी बॅंकेकडून व्यवसायासाठी 6 लाख रुपये कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड केल्यावरही बॅंकेने शहाणे यांच्या तारण मालमत्तेचा लिलाव केला.

याबाबत बॅंकेचे अध्यक्ष व्यवहारे, माजी अध्यक्ष चौधरी यांच्यासह तत्कालिन तलाठी करपे, मंडलाधिकारी दाते (पूर्ण नाव समजले नाही), बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे, वसुली अधिकारी प्रवीण निघोट, व्यवस्थापक आप्पासाहेब थोरात, अनिल मापारी, दत्तात्रेय भुजबळ, रमेश मासाळ, भरत पाचारणे, अरुण आवारी व संतोष भनगडे यांच्याविरुद्ध पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT