The incidence of theft decreased in Ahmednagar 
अहिल्यानगर

तबलिगीमुळे उडाली पारनेरकरांची झोप...काय खरं काय खोटं

सकाळ वृत्तसेवा

पारनेर : पारनेर पोलिस ठाण्याच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलेल्या 26 परदेशी तबलिगींना कोरोनाची लागण झालेली नाही. त्यांचे अहवाल निगेटीव्ह आहेत. त्यांची न्यायालयाच्या आदेशाव्यतिरिक्त कोणतीही बडदास्त ठेवली जात नाही. स्थानिक नागरीकही त्यांच्या संपर्कात नसल्याचा खुलासा सहाययक पोलिस निरिक्षक राजेश गवळी यांनी केला.

या परदेशी नागरिकांना येथे आणल्यानंतर त्यांची विशेष बडदास्त ठेवण्यात येते. त्यांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. स्थानिक नागरीक या आरोपींच्या संपर्कात आहेत. त्यांना फळे तसेच विविध प्रकारचे जेवण पुरविले जाते. अशा अफवा शहरात पसरल्या होत्या. या मुळे स्थानिक लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होईल, अशा भीतीने अनेकांची झोप उडाली आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर उपनगराध्यक्ष दत्तात्रय कुलट यांच्यासह नगरसेवक चंद्रकांत चेडे, अर्जुन भालेकर, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, विशाल शिंदे यांनी गवळी यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी वरील खुलासा केला.

आरोपींना नगर न्यायालयात नेण्यासाठी जवळचे ठिकाण म्हणून पारनेरची निवड केल्याचे गवळी यांनी सांगितले.
रमजानचे उपवास असल्याने त्यांना पहाटे व सायंकाळी जेवण दिले जाते. सामान्य आरोपींना जे जेवण दिले जाते त्यांची कोणत्याही प्रकारची वेगळी बडदास्त ठेवली जात नाही, असेही ते म्हणाले.

या परदेशी नागरीकांना येथे आणल्यानंतर त्यांची विशेष बडदास्त ठेवली आहे. त्यांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. स्थानिक नागरीक या आरोपींच्या संपर्कात असून ते दररोज पहाटे तसेच दिवसभरात त्यांच्याशी संपर्क करतात. त्यांना फळे तसेच विविध प्रकारचे जेवण पुरविले जाते. अशा प्रकारच्या अफवा दोन दिवसांपासून शहरात पसरल्या होत्या.

परदेशी आरोपींच्या संपर्कात आलेल्या स्थानिक नागरकांमुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होईल अशी भीतीही व्यक्त करण्यात येत होती. त्या पार्श्‍वभुमिवर या नगर सेवकांनी गवळी यांची भेट घेतली होती.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : शिरूरमध्ये गोळीबाराचा थरार; हरी गंगावणे यांचा मृत्यू, CCTV फुटेज समोर

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

IND vs PAK Asian Games : श्रेयस अय्यरचा संघ आशियाई स्पर्धेत पाकिस्तानला भिडणार? जाणून घ्या हा महामुकाबला केव्हा होणार

Marathi News Live Updates : शिरूरच्या आंबेडकर नगरमध्ये गोळीबार; दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर झाडल्या गोळ्या

Tukaram Mundhe:तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांमधील भरमसाठ बिलांचा पर्दाफाश तुमची कशी होतेय लूट?

SCROLL FOR NEXT