fuel prices sakal
अहिल्यानगर

पाथर्डी : तहसील कार्यालयात भाजयुमोचे आंदोलन

राज्य सरकारने इंधनाचे दर कमी करावेत

सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी: राज्य सरकारने इंधनाचे दर कमी करावेत, या मागणीसाठी आज (बुधवारी) भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या दारात  घोषणाबाजी केली. तुमच्या भावना वरिष्ठ कार्यालयास कळवण्यात येतील, असे आश्वासन नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ यांनी दिल्यानंतर घोषणाबाजी बंद करण्यात आली.

युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर, बाळासाहेब गोल्हार, नारायण पालवे, शुभम गाडे, अमोल शेळके, हरिभाऊ वायकर, नवनाथ जिवडे, अंबादास दहिफळे, अशोक दहिफळे, किशोर राठोड आदी तहसील कार्यालयात गेले. दारात त्यांनी राज्य शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत कार्यालय दणाणून सोडले.

या आंदोलनाची दखल घेत गुंजाळ आंदोलनस्थळी आले व त्यांनी निवेदन स्वीकारत, वरिष्ठ कार्यालयाला तुमच्या भावना कळवण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन विसर्जित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT