करुणा शर्मा sakal
अहिल्यानगर

पाथर्डी : हुकूमशाही पवणार ;करुणा शर्मा

शिवशक्ती सेनेच्या माध्यमातून सर्व सामान्यांना न्याय

सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी : राज्यात सत्तेवर असलेल्या तिघाडी शासनाच्या काळात बीड जिल्ह्याची अवस्था बिहारसारखी झाली. आपल्या पत्नीला जेलमध्ये टाकणाऱ्या नेत्याची हुकूमशाही संपवून टाकणार असल्याची टीका शिवशक्ती सेनेच्या अध्यक्ष  करुणा  शर्मा यांनी धनंजय मुंडे यांचा नामोल्लेख टाळून केली.

पाथर्डी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. बाबूराव बडे, गणेश बडे, मच्छिंद्र सांगळे, रमेश गिरे, हनुमंत गिरे उपस्थित होते. यावेळी मुंडे म्हणाल्या, की बीड जिल्ह्यात चारशे पंचाहत्तर बलात्कार झाले असून, दोन महिलांनी आत्महत्या केल्या. परिवर्तन हा सृष्टीचा नियम असून, या नियमाला धरून आता परिवर्तन होणार आहे. तिघाडी शासनाच्या काळात घराणेशाहीला थारा देत हुकूमशाही राबवली जात असून, या हुकूमशाहीच्या विरोधातील आपला लढा चालूच राहणार आहे. मी आवाज उठवते म्हणून मला धमक्या दिल्या जात असल्या, तरी या धमक्यांना मी भीक घालत नाही. उद्या मी असेल किंवा नसेलही, पण मी सुरू केलेला लढा हा चालूच राहणार आहे.

बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत फाटक्या माणसांना उमेदवारी देत मी त्यांना निवडून आणणार आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यात राजकारण कमी अन समाजकारण अधिक असणार आहे. धर्तीवर खूप पाप झाल्यानंतर श्रीराम, श्रीकृष्ण, शिवाजी महाराज जन्माला आले होते. सध्याही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. क्रांती करण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नसून ही क्रांती झाल्यानंतर शांती निर्माण होणार आहे.

आता परिवर्तन अटळ

तिघाडी शासनाच्या काळात वकील, पोलिसांनाही जेलमध्ये टाकले जात आहे. जे त्याग करतात तेच इतिहास रचत असल्याने मी आगामी काळात इतिहास घडवणार आहे. हे शासन लोकांच्या हाताला काम देत नसून केवळ भ्रष्टाचार करण्याचे काम चालू आहे. माझ्यावर झालेला अन्याय राज्यातील जनता उघड्या डोळ्याने पाहत असून आता परिवर्तन अटळ, असे शर्मा म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

SCROLL FOR NEXT