पुनीत सोनी sakal
अहिल्यानगर

पाथर्डी : खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक

आरोपीला पाथर्डी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी : गेल्या तीन वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला पाथर्डी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तालुक्यातील रांजणी गावात २०१९ मध्ये बुट्या उर्फ शिवराम साहेबराव पवार (रा. रांजणी) याने गावात बांधकामावर काम करणाऱ्या साहिल ऊर्फ सोन्या मुबारक पठाण (वय १९, रा. खोसपुरी, ता. नगर) या मजुराच्या डोक्यात कुऱ्हाडाचा घाव घालून हत्या केली होती.

या घटनेनंतर पवार हा फरार झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र तो सापडत नव्हता. पोलिसांना एका खबऱ्याने माहिती दिली की, पवार हा बीड जिल्ह्यातील देवी निमगाव (ता.आष्टी) येथे डोंगर परिसरात असलेल्या त्याच्या सासरवाडीत राहत आहे. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कौशल्य रामनिरंजन वाघ, सहाय्यक उपनिरीक्षक लक्ष्मण पवार, कुमार कराड, पोलिस नाईक अनिल बडे, नीलेश म्हस्के, अरुण शेकडे, अतुल शेळके यांनी देवी निमगाव परिसरातील डोंगरातून संशयित आरोपी पवार याला बेड्या ठोकल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Kolhapur Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री कोल्हापुरात दाखल होणार; अंबाबाई मंदिराबाबत मोठा निर्णय, पाहा मिनिट-टू-मिनिट कार्यक्रम

Mumbai BEST Bus Strike : मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप; रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट, प्रवाशांमध्ये संताप

Lote MIDC Water Crisis : कोकणातील उद्योगांवर 40 वर्षांत प्रथमच मोठं संकट! 15 जूनपासून एमआयडीसीचे पंपिंग स्टेशन बंद; पुढील दोन दिवसांत सर्व कंपन्या कुलूप लावणार

साखर कमी, अँटीऑक्सिडंट्स भरपूर! रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं जांभूळ मध 'या' आजारासाठीही ठरतं वरदान

Stock Market Today: एका रिपोर्टने शेअर बाजारात घातला धुमाकूळ! Infosysy, TCS, Tech M कोसळले; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT