Ahmednagar Crime Sakal
अहिल्यानगर

Ahmednagar Crime : भर रस्त्यात मुलींची काढली छेड; पाथर्डीतील धक्कादायक घटना, Video Viral

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे.

दत्ता लवांडे

पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील तीसगाव येथे शहरामध्ये एका तरूणाने तरूणीची छेड काढल्याची घटना घडली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हा व्हिडिओ ट्वीटरवरून शेअर केला आहे. तर या तरूणावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, रस्त्यावर दोन मुली जात असताना एका नराधमाने मुलीला धरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एक मुलगी तिथून पळून जाते आणि तो नराधम या तरूणीची छेड काढत आहे. तिथे उभा असलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला असून या प्रकारानंतर सदर तरूणावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

"अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शहर मध्ये भर रस्त्यात मुलींची छेडछाड केली जात असल्याचा व्हिडिओ वायरल होत आहे. भरदिवसा रस्त्यात मुलींना असा त्रास देण्याचा प्रकार गंभीर आणि मुलींच्या सुरक्षितेच्या दृष्टीने चिंताजनक आहे.

या व्हिडीओची दखल घेत राज्य महिला आयोगाने पोलिस अधीक्षक, अहमदनगर यांना तातडीने चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत." असं ट्वीट रूपाली चाकणकर यांनी केलं असून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT