pathardi
pathardi sakal
अहमदनगर

कन्व्हर्जन किट मुळे होणार विद्युतऊर्जेवरील वाहनामध्ये रूपांतर; पाथर्डीच्या तरुणाचा शोध

सकाळ वृत्तसेवा

पेट्रोलवरील मोटारसायकलचे होणार विद्युतऊर्जेवरील वाहनामध्ये रूपांतर

तिसगाव : वाढत्या इंधन दरवाढीला आळा घालण्यासाठी, तसेच प्रदूषणमुक्त वाहननिर्मितीला(pollution free cars) चालना देण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (National Green Tribunal)स्थापन झाले. त्यांच्या निर्देशानुसार १५ वर्षे जुन्या पेट्रोल वाहनांची नोंद रद्द होत आहे. देशात विद्युतऊर्जेवरील वाहनांची क्रेझ वाढत आहे. महाराष्ट्र शासनानेही आता सरकारी कार्यालयांसाठी विद्युतऊर्जेवरील वाहनांची अट घातली आहे. त्यामुळे भविष्यात सर्वच वाहने विद्युतऊर्जेवर चालतील, हे ओळखून गोगोए-१ या कंपनीने पेट्रोल, डिझेलवरील वाहने विद्युतऊर्जेवरील वाहनांमध्ये रूपांतरित करण्यास सुरवात केली आहे.

विशेष म्हणजे हे स्टार्ट-अप करणारे पाथर्डी तालुक्यातील भोसे गावचे आहेत. श्रीकांत शिंदे असे त्यांचे नाव. त्यांनी गोगोए-१ नावाने हा प्रयोग केला आहे. या कंपनीस मोटारसायकलींसाठीच्या इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किटला आरटीओकडून परवानगी मिळाली आहे. भोसे (ता. पाथर्डी) येथे वाहने रूपांतरित करण्यात येत आहेत. या मोठ्या प्रकल्पाबाबत माहिती देताना शिंदे म्हणाले, की २०११ मध्ये सुरू झालेली गोगोए-१ ही कंपनी विद्युतऊर्जा व सौरऊर्जेवर चालणारी वाहने व त्यांचे सुटे भाग उपलब्ध करून देत आहे. भारतात सर्वांत जास्त विक्री होणाऱ्या बाईकसाठी गोगोए-१ ने इलेक्ट्रिक कव्हर्जन किट गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लॉन्च केले. या दुचाकीस 72v 40ah बॅटरी आहे. एका चार्जमध्ये अनुकूल परिस्थितीत सरासरी १५१ किलोमीटरपर्यंत हे वाहन धावते.

विद्युतऊर्जेवरील वाहनांचे वाढते महत्त्व, पर्यावरणपूरक योजना पाहता, आम्ही आमचे व्हीजन बनविले आहे. आपल्याकडील वाहन स्क्रॅप (भंगार) करण्यापेक्षा किंवा विद्युतऊर्जेवरील नवीन वाहन खरेदी करण्यापेक्षा त्यालाच रूपांतर करावे. खर्चाच्या दृष्टिकोनातून हे सोयीस्कर आहे.या वाहनासाठी लागणारे सुटे भाग बाजारात सहज उपलब्ध होतात. आम्ही तयार केलेल्या कन्व्हर्जन किटला महाराष्ट्रासह केरळ, तमिळनाडू अशा विविध राज्यांतून मागणी आहे.

तीनचाकीसाठीही किट बनवणार

दिल्ली परिवहन विभागाकडून विद्युतऊर्जेवरील वाहनांत रूपांतर करण्याच्या योजनेत आमचा समावेश केला आहे. दुचाकीसह आम्ही या वर्षी तीन चाकी वाहनांसाठी इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट(eleteric cars) बनविणार आहोत. पुढील वर्षात चारचाकी व अवजड वाहनांसाठी किट बनविण्यात येणार आहेत. भोसे येथे विद्युतऊर्जेवरील वाहनांचा अभ्यास, उत्पादनांची निर्मिती,(production) कन्व्हर्जन किट्स बनविणे, रोजगारनिर्मितीसह कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण(traning at workers) देणे या गोष्टींवर भर दिला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT