Ahmednagar  Sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : पाडलेला पूल वाहतुकीच्या मुळावर

कोल्हारकरांना कोंडीचा पुन्हा त्रास; नियोजनशून्य कारभाराचा प्रवाशांना फटका

सुहास वैद्य

कोल्हार : नगर- कोपरगाव रस्त्यावरचा प्रवरा नदीवरील जुना पूल पाडण्याची केलेली घाई वाहतुकीच्या मुळावर उठली आहे. नियोजनशून्य कारभारामुळे अशी स्थिती उद्‌भवली आहे. सहा महिन्यांपूर्वी हा पूल पाडण्यात आला. दुर्दैवाने यामुळे रस्त्याच्या समस्येत भर पडली.

सध्या एकाच पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू असून, त्या पुलावर एखादे वाहन बिघडल्यावर वाहतूक ठप्प होते. त्याचा त्रास इतर प्रवाशांसह प्रमुख बाजारपेठेच्या कोल्हार, भगवतीपूर व कोल्हार खुर्द या गावांना पुन्हा सहन करावा लागत आहे. पाचवीला पुजलेल्या या त्रासातून मुक्त होण्याची तर शाश्वतीच वाटेना. खड्ड्यांमुळे खडतर झालेल्या या रस्त्याच्या डागडुजीला मुहूर्त सापडला. रस्त्याच्या कामाची सुधारित निविदा प्रक्रिया दुसऱ्यांदा सुरू झाली. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला.

रस्त्याच्या समस्येबाबत जनतेचा रोषही त्यांना पत्करावा लागला. खड्डे बुजविण्याचे काम सुरू असले, तरी अपघातांची मालिका थांबण्याची चिन्हे दिसेनात. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात घडल्याने प्रवाशांना प्राण गमवावे लागत आहेत. अनेकांना अपंगत्व आले आहे. अनेक वर्षे दुरवस्थेतील या ऐतिहासिक रस्त्याचा व कोल्हारच्या पुलाच्या सदैव आठवणीत राहणाऱ्या यातनादायी प्रवासाचा अनुभव राज्यासह परराज्यांतील प्रवासी घेत आहेत.

कोल्हारच्या प्रवरा नदीवरील दोन समांतर पुलांपैकी जुना पूल धोकादायक झाल्याने तो साडेचार वर्षांपूर्वी जड व हलक्या वाहतुकीसाठी बंद केला. तो किमान दुचाकी वाहनचालक व पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी सोयीचा होता.

रस्त्याचे काम सुरू होणार म्हणून तो सात महिन्यांपूर्वी पाडण्यात आला. म्हणजे रस्त्याची चाळण झालेली असतानाही जुना पूल पाडल्यामुळे तो वाहतुकीला बंद केला. साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सध्या सुरू आहे. त्यामुळे ऊसवाहतुकीसाठी पुलावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. कोणतेही वाहन पुलावर बिघडल्यावर ते बाजूला करेपर्यंत वाहतूक ठप्पच राहते.

पुलावरील समस्या जटिलच

रस्त्याचे काम येत्या जानेवारीत सुरू होऊन ते वर्षभरात पूर्ण होणार असल्याचे नियोजित आहे. रस्त्याच्या कामात नवीन पुलाचे काम समाविष्ट असल्याचे समजते. तोपर्यंत रस्त्याच्या अनिश्चिततेच्या गर्तेत अडकलेल्या एकाच पुलावरील वाहतुकीची व अपघातांची समस्या जटिल राहील, हे मात्र स्पष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT