पेट्रोल पंप ई सकाळ
अहिल्यानगर

पोलिसांविरोधात पेट्रोलपंप व्यवस्थापकाची थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार

पेट्रोलसाठी दमदाटी केल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा

संजय आ. काटे

श्रीगोंदे : शहरातील कानन पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना पोलिसांनी दमदाटी केल्याचा आरोप करीत व्यवस्थापकाने थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी, सार्वजनिक ठिकाण असल्याने मास्क न घातल्याने कारवाई केल्याचा दावा केला आहे.

कानन पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक विजय आनंदकर व कर्मचाऱ्यांनी याबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की (ता. 6) सायंकाळी चार वाजता पंप बंद असताना श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील काही कर्मचारी पंपावर आले. त्यांनी गणवेशही घातलेला नव्हता. पंपावर एकच कर्मचारी उपस्थित होता. (Petrol pump manager's complaint against the police)

"आम्ही पोलिस आहोत,' असे सांगत इंधन देण्याची मागणी केली. मात्र, "पंप नियमानुसार बंद असून, तुम्हाला पेट्रोल पंप व्यवस्थापकांशी बोलावे लागेल,' असे सांगितले. त्यावर पोलिसांनी थेट स्नानगृहात येत जाब विचारला व मास्क नसल्याने दंडात्मक कारवाई करीत दमदाटी केली. खोटे गुन्हे दाखल करू, असेही सुनावले. त्यामुळे अशा पद्धतीने सामान्यांना धमकावणाऱ्या पोलिसांची चौकशी करण्याची मागणी केली.

मास्क नसल्याने कारवाई

पोलिस कर्मचाऱ्यांनी दमदाटी केली नाही. सार्वजनिक जागा असल्याने व मास्क नसल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली. त्याचा त्यांना राग आल्याने ही तक्रार करण्यात आली असेल. याबाबत चर्चेतून तोडगा काढू.

- रामराव ढिकले, पोलिस निरीक्षक, श्रीगोंदे पोलिस ठाणे

(Petrol pump manager's complaint against the police)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं-चांदीचे भाव घसरले! चांदी तब्बल ₹8,000 ने स्वस्त; पाहा आजचा ताजा भाव

Shoaib Akhtar : पाकिस्तानमधील क्रिकेट नामशेष होण्याच्या मार्गावर! भारताविरुद्ध लाजीरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तरने सुनावलं, नेमकं काय म्हणाला?

Australia vs Sri Lanka: झिम्बाब्वेच्या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलियाची कसोटी, आज श्रीलंकेशी निर्णायक लढत

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

Mumbai : अल्पवयीनाने कारनं उडवलं, १० दिवसांनी पतीचा मृत्यू; पत्नीची प्रकृतीही चिंताजनक

SCROLL FOR NEXT