The PF and retirement amount will be directly credited to the beneficiary's account 
अहिल्यानगर

पीएफ व सेवानिवृत्ती रक्कम थेट लाभधारकाच्या खात्यावर होणार वर्ग

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर : भविष्यनिर्वाह निधी (पीएफ), सेवानिवृत्ती रक्कम आता कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्‍ट (सीएमपी) प्रणालीद्वारे अर्थ विभागातून स्टेट बॅंकेत न जाता थेट लाभधारकांच्या खात्यांवर जमा होणार आहे, अशी माहिती शिक्षक परिषदेचे राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहकले यांनी दिली.

शिक्षक परिषदेने यासाठी वेळोवेळी पाठपुरावाही केला. या प्रणालीचे उद्‌घाटन बुधवारी (ता. 15) मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्या हस्ते झाले. यापुढे सीएमपी प्रणालीने, प्रकरण मंजुरीनंतर एकाच दिवसात संबंधितांच्या खात्यांवर रकमा वर्ग होणार आहेत.  

या अगोदर ही रक्कम कोशागारातून स्टेट बॅंकेत व त्यानंतर लाभधारकांच्या खात्यांवर जमा होत होती. या प्रक्रियेसाठी आठ ते पंधरा दिवसांचा कालावधी लागत असे. नव्या प्रणालीच्या यशस्वितेसाठी अर्थ विभागाचे ए. बी. बोंदर्डे व सुशील विधाते यांनी प्रयत्न केले.

अखेर हा विषय मार्गी लागल्यामुळे परिषदेच्या पाठपुराव्याला यश मिळाले. भविष्यनिर्वाह निधी प्रकरणांच्या मंजुरीचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सकारात्मक असून, तोही प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! हडपसर-मुझफ्फरपूर रेल्वेला मुदतवाढ; डब्यांच्या रचनेतही बदल, २० जादा फेऱ्यांचे नियोजन

Asian Games Swimming : १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रिषभ दास सहाव्या स्थानावर; ५४.७७ सेकंदांची वेळ

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT