Photos of wolf Russia exhibition International award to ahmednagar photographer omkar bedre sakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : लांडग्यांच्या छायाचित्रांनी गाजवले रशियाचे प्रदर्शन; नगरचा छायाचित्रकार ओंकार बेद्रेला आंतरराष्ट्रीय बक्षीस

ओंकारने सलग चौथ्या वर्षी मिळविलेल्या यशामुळे अहमदनगरचे नाव जागतिक पातळीवर पुन्हा झळकले

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : ३५ फोटो प्रो प्रोफेशनल फोटोग्राफी कम्युनिटी (रशिया) यांनी आयोजित केलेल्या ३५ अॅवॉर्ड्‌स या आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये शहरातील ओंकार बेद्रे यांच्या छायाचित्रांनी सिरीज (९ छायाचित्रे) जागतिक स्तरावर तिसरा क्रमांक पटकाविला.

या स्पर्धेमध्ये 174 देशांतील 1 लाख 04 हजार 814 छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता. एकूण 4 लाख 45 हजार छायाचित्रे सदर स्पर्धेसाठी प्रवेशिका म्हणून आली होती. या स्पर्धेचे परीक्षण जगातील 50 देशांतील 50 नामांकित छायाचित्रकारांनी केले.

या स्पर्धेमध्ये ओंकार यांनी सूर्यास्ताच्या वेळी भारतीय लांडग्याच्या छायाचित्रांची सिरीज जागतिक स्तरावर पाठवली होती. ती 35 छायाचित्रांच्या सिरीजमध्ये सामील झाली. त्या सिरीजला जागतिक पातळीवर तिसरा क्रमांक मिळाला.

वरील स्पर्धेमध्ये दर वर्षी जगातील सर्वश्रेष्ठ 35 छायाचित्रांच्या सिरीज निवडतात. या वर्षी स्पर्धेमध्ये भारतातील फक्त 4 छायाचित्रकारांचा समावेश होता. त्यांपैकी अहमदनगरचा ओंकार जागतिक पातळीवर तिसर्‍या स्थानी झळकला. ओंकारने सलग चौथ्या वर्षी मिळविलेल्या यशामुळे अहमदनगरचे नाव जागतिक पातळीवर पुन्हा झळकले.

पहिल्या छायाचित्रात लांडगा ओरडताना दिसत आहे. त्याच्या मागील बाजूस सूर्य अस्ताला जात असल्याचे दिसते आहे. दुसऱ्या छायाचित्रात कोल्ह्याला दोन्ही बाजूंनी वेढले आहे. तिसरे छायाचित्र संपूर्ण तांबडा समुद्र असल्याचे भासते आहे. हे छायाचित्र परीक्षकांना भावले आहे. त्यांनी लांडग्याच्या या सिरीजला तिसरा क्रमांक दिला आहे.

दीड वर्ष वाट पाहिली

रशियातील छायाचित्र प्रदर्शनासाठी ओंकारने पाठविलेल्या लांडग्याची सीरिज कॅमेराबद्ध करण्यासाठी त्याला तब्बल दीड वर्ष लागले. नर-मादी आणि त्यांच्या पिलाची ही छायाचित्रे आहेत. लहानपणापासूनच तो लांडग्याच्या या कुटुंबावर वॉच ठेवून होता. विशेष म्हणजे नगर परिसरातच ओंकारने ही छायाचित्रे काढली आहेत. एकेक छायाचित्र मिळवण्यासाठी महिना महिना वाट पाहावी लागत असल्याचे ओंकारने दैनिक ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : भारतीय मिचेल स्टार्क! ३० लाखांवरून पोहोचला थेट ८.४० कोटी; कोण आहे Auqib Nabi? पाहा गोलंदाजीचा Video

Stock Market Today : शेअर बाजार लाल रंगात बंद; रुपयाच्या कमजोरीने बाजारात दबाव; वेदांताचे शेअर्स मात्र तेजीत!

Sugar-Free Gajar Gulab Jamun: हिवाळ्यात हेल्दी डिझर्टचा परफेक्ट पर्याय; झटपट बनवा गाजराचे शुगर-फ्री गुलाबजाम

IPL 2026 Auction: काव्या मारनला हवा होता फिरकीपटू, पण राजस्थान रॉयल्सने ७.२० कोटी मोजून मारली बाजी; ठरला महागडा भारतीय

मंत्री कोकाटेंना दणका! २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, जिल्हा न्यायालयानेही निर्णय ठेवला कायम

SCROLL FOR NEXT