विद्यापीठाने तयार केलेल्या नानकटाई कुकीज/बिस्किटांचा दर्जा,  sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : राहुरीच्या नानकटाई कुकीज/बिस्किटांना पेटंट

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या बेकरी

सकाळ वृत्तसेवा

राहुरी विद्यापीठ: महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या बेकरी युनिटमध्ये तयार होणाऱ्या नानकटाई कुकीज/बिस्किटांना भारतीय बौद्धिक मालमत्ता/संपदा अधिकार प्रमाणपत्र अर्थात पेटंट अधिनियम १९७० च्या कायद्यानुसार २० वर्षांसाठी प्रदान करण्यात आले. यामुळे विद्यापीठाने तयार केलेल्या नानकटाई कुकीज/बिस्किटांचा दर्जा, गुणवत्ता व त्याचे सार्वभौमत्व हक्क विद्यापीठास प्राप्त झालेली आहेत. बेकरी युनिटच्या या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी विभाग प्रमुख डॉ. उत्तम चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

विद्यापीठाच्या या बेकरी युनिटमध्ये अद्ययावत उपकरणांच्या मदतीने स्वच्छ, सुरक्षित वातावरणात शास्त्रीय पद्धतीने पौष्टिक असे ब्रेड, बनपाव, नानकटाई, सुरती बटर, मिल्क टोस्ट, नाचणी बिस्कीट तसेच आयुर्वेदिक कुकीज इत्यादी उत्पादने तयार केली जातात. बेकरी युनिट मध्ये तयार होणाऱ्या औषधी फुले शतावरी, फुले अश्वगंधा, फुले आवळा, फुले पुदिना आणि फुले बेहडा या बिस्किटांचे उत्पादन शास्त्रीय पद्धतीने स्वरूपात केले जाते.

आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या व करोना काळातही सर्वांना उपयुक्त व प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या या बिस्किटांचा तसेच या युनिटमध्ये तयार होणाऱ्या इतर खाद्यपदार्थांचा उपयोग विद्यापीठातील व इतर सर्व लोकांनी खाद्यान्न म्हणून करावा असे आवाहन कुलगुरू डॉ. पाटील यांनी केले आहे.या बेकरी प्रकल्पास नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी भेट दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

SCROLL FOR NEXT