PM-Kisan esakal
अहिल्यानगर

PM-Kisan: शेतकरी सन्मान योजनेसाठी ई-केवायसी आवश्यकच; अन्यथा १४ व्या हप्त्याचा होणार नाही जमा

आधारकार्ड बॅंक खात्याशी संलग्न करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

सकाळ डिजिटल टीम

बीड: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला केंद्र सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. योजनेच्या १४ व्या हप्त्याचा लाभ जूनमध्ये जमा होणार आहे.

केंद्र सरकारने या १४ व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांचा लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न (जोडणे) व ई-केवासी प्रमाणीकरण करणे बंधनकारक असून या दोन्ही बाबी लाभार्थ्यांनी परिपूर्ण केल्याशिवाय पुढील हप्त्याचा लाभ जमा होणार नाही. त्यामुळे ई केवायसी प्रमाणिकरण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तसेच आपला आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावा, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबाला वर्षांतून तीन वेळा या योजनेचा प्रत्येकी दोन हजार रुपये हप्त्याप्रमाणे वर्षांतून सहा हजार रुपये देण्यात येतात.

आगामी १४ व्या हप्त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करण्याचे शासनाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी पोस्ट ऑफिस कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा केंद्रावर आधार कार्ड बँक खात्याला संलग्न करून घ्यावे.

यासाठी आधारकार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे पोस्टात कर्मचाऱ्यांमार्फत इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) खाते उघडावे. बँक खाते ४८ तासांत आपल्या आधार क्रमांकाशी जोडले जाईल.

ही पद्धत अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने सुलभ आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वरील प्रमाणे तत्काळ ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT