अहिल्यानगर

PM Modi Nagpur: फेब्रुवारीत पंतप्रधान मोदी करणार नागपुर दौरा, अनुसूचित जाती मोर्चाच्या अधिवेशनात घेणार सहभाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक लक्ष घालत असून मुंबई, सोलापूर, नाशिक नंतर ते फेब्रुवारी महिन्यात नागपूर येणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

PM Narendra Modi in Nagpur: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक लक्ष घालत असून मुंबई, सोलापूर, नाशिक नंतर ते फेब्रुवारी महिन्यात नागपूर येणार आहेत. सध्या तारीख आणि कार्यक्रमाची घोषणा झाली नसली तरी भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

नागपूरमध्ये भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्यावतीने राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात येणार आहे. यात ते सहभागी होणार आहेत. सोबतच ते यवतमाळचा दौराही करणार असल्याचे समजते. भाजपाच्या बैठकीत मोदी यांच्या दौऱ्याची रुपरेषा आखण्यावर चर्चा झाली.

अनुसूचित जाती मोर्चाचे अधिवेशन नागपूर आणि आगरा या दोन शहरांमध्ये घेण्यात येणार आहे. आगरा येथील संमेलनात उत्तर भारताचे तर नागपूरमधील संमेलनात महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. (Latest Marathi News)

त्या दृष्टीने शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मोदी संबोधित करणार असल्याने संमेलनासाठी विशाल जागेचा शोध घेतला जात आहे. नागपूर विद्यापीठाचे मैदान किंवा मानकापूर येथील क्रीडा संकुलाचा यासाठी विचार केला जात असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll Predictions 2026 : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडूमध्ये कोणाची सत्ता येणार? 'एक्झिट पोल'चे धक्कादायक आकडे, ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्याला सुरुंग?

Exit Poll: बंगालमध्ये राजकीय थरार! BJP बहुमताच्या उंबरठ्यावर, TMC ला मोठा फटका; 15 वर्षांनंतर सत्ताबदलाचा भूकंप

Latest Marathi News Live Update: केरळमध्ये आमची बाजू कमकुवत असली तरीही भाजपचेच राज्य येईल - भाजप खासदार मनोज तिवारी

Nandur Sarpanch Election: दौंड तालुक्यातील नांदूर ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे विशाल थोरात सरपंचपदी विजयी; संतोष बबन बोराटे यांना धक्का

Assam Election Exit Poll : आसाममध्ये पुन्हा एकदा फुलणार कमळ! NDA ला 100 जागा मिळण्याचा अंदाज, काँग्रेसच्या स्वप्नांवर पाणी; पाहा कोणाला किती जागा?

SCROLL FOR NEXT