The police are watching the wedding 
अहिल्यानगर

लग्न करताय पोलिसांचा आहे वॉच, बसेल भुर्दंड

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर ः तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे तहसीलदारांनी पोलिस प्रशासनाला प्रत्येक विवाह सोहळ्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी विवाहसोहळ्यात नियमापेक्षा जास्त लोक सहभागी झाल्यामुळे संयोजकांवर दंडात्मक कारवाई केली.

तालुक्‍यात मार्च महिन्याच्या सुरवातीपासूनच कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे मध्यंतरी ओस पडलेली रुग्णालये पुन्हा भरू लागली आहेत. प्रशासनालाही बंद केलेली तालुक्‍यातील कोविड सेंटर पुन्हा सुरू करावी लागली आहेत. कोरोनाबाबत बेफिकीर झालेले नागरिक मोठ्या संख्येने विवाहसोहळ्यांना उपस्थित राहत आहेत. याबाबत वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या सोहळ्यांतील वऱ्हाडींमुळे कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. 

वाढणारी रुग्णसंख्या पाहता, तालुक्‍यातील प्रत्येक विवाहसोहळ्याचे चित्रीकरण करण्याचे आदेश तहसीलदारांनी आश्‍वी, घारगाव, संगमनेर तालुका व शहर पोलिसांना दिले आहेत. त्याची कठोर अंमलबजावणी सुरू झाली आहे.

मंगळवारी (ता. 9) तालुक्‍यातील घुलेवाडी हद्दीतील पाहुणचार लॉन्स व गुंजाळवाडी येथील लक्ष्मीनगरमध्ये विवाहसोहळ्यास प्रमाणापेक्षा जास्त गर्दी झाल्याने, संयोजकांना प्रत्येकी 10 हजार रुपये दंड करण्यात आला. राजापूर येथील विठाई मंगल कार्यालयातील सोहळ्यात सामाजिक अंतराचा नियम मोडल्याने 10 हजार रुपये दंड करण्यात आला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 आधीच ‘फ्री पास’ घोटाळा उघड! माजी क्रिकेटरच निघाला मास्टरमाइंड, तिकीटांचा काळाबाजार प्रकरणी पोलिसांकडून अटक

Latest Marathi News Live Update : उत्तर पुणे जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे

Pune University: पुणे विद्यापीठात आर्थिक गैरव्यवहार? 'फॉरेन्सिक ऑडिट'साठी एका महिन्यात निविदा

Gas Shortage: भारताने शोधला होर्मुजला पर्याय! 'या' मार्गाने होतोय मुबलक तेल पुरवठा

'ऑल दि बेस्ट' नाटकाच्या नवीन टीमचा ३०० वा प्रयोग! कधी आणि कुठे घ्या जाणून

SCROLL FOR NEXT