covid 19 
अहिल्यानगर

कोविड सेंटरमधून पळालेला बाधित कैदी सुप्यात जेरबंद

विलास कुलकर्णी

राहुरी (नगर) : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तात्पुरत्या कोविड केअर सेंटरमधून पळालेल्या कोरोनाबाधित कैद्यास काल (मंगळवारी) रात्री सुपे (ता. पारनेर) येथे पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. 

कृषी विद्यापीठातील कोविड सेंटरमधून 15 ऑगस्टला सकाळी पावणेसात वाजता खिडकीचे गज वाकवून 38 वर्षीय कोरोनाबाधित कैद्याने पलायन केले. जिल्ह्यातील पोलिस पथके त्याच्या मागावर होती. पारनेर येथील कारागृहात तो कोरोनाबाधित आढळला होता. त्याच्याविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नगर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 

हा कैदी कामरगाव येथील रहिवासी असून, तेथे त्याची चार एकर शेती आहे. तो जमीन विकण्याच्या प्रयत्नात असल्याचे पोलिसांना समजले. सुपे येथे जमिनीचा सात-बारा उतारा काढण्यासाठी तो येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, राहुरी व पारनेर पोलिसांनी सापळा लावला. सुपे येथे टपरीच्या आडोशाला थांबलेल्या कैद्यास पोलिसांनी घेरले. पोलिसांना पाहताच, त्याने गटारीत उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने त्यास अटक केली. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील 'शेतकरी निवास' इमारतीत नगर जिल्ह्यातील कोरोनाबाधित कैद्यांसाठी तात्पुरते कोविड केअर सेंटर उभारले होते. तेथे पारनेरचे 36, श्रीरामपूरचे 17, राहुरीचे 2, असे एकूण 55 कोरोनाबाधित कैदी ठेवले होते. मात्र, तेथून कैद्याने पलायन केल्यावर सर्व कैदी घटनेच्या तिसऱ्या दिवशी नगरला हलविले. नगर येथे सबजेलजवळ एका शाळेत कडेकोट पोलिस बंदोबस्तात कैद्यांना ठेवले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय- हर्षवर्धन पाटील

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT