पोलीस sakal
अहिल्यानगर

खुणाच्या गुन्ह्यातील १ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद

अहमदनगर जिल्ह्यातील एम.आय.डी.सी या ठिकाणी लपून रहात होता

सकाळ वृत्तसेवा

आळेफाटा: खुण्याच्या गुन्ह्यातील १ वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीला आळेफाटा पोलीसांणी केले जेरबंद याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशन कडुन मिळालेल्या माहितीनुसार आळे (ता.जुन्नर) या ठिकाणी दि. १० - ३-२०२१ रोजी मोहनसिंग ननहकसिंग (वय४०) सध्या राहणार आणे ता.जुन्नर व मुळ गाव मुरमा थाना मेदीनीनगर सतबरवा पलामु राज्य झारखंड याच्या डोक्यात अज्ञात व्यक्तीने सिमेंटचा ब्लॉक ने मारहान करून गंभीर जखमी करून ठार केले होते. याबाबत पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती.

या गुन्ह्यातील तपास पोलीसांनी चालु केला असताना संशयित आरोपी सुधीर चंपावत जाधव (वय ३८) राहणार विळद जि.अहमदनगर मुळ गाव आरंडगाव ता.संगमनेर हा गुन्हा घडल्यापासुन आळेफाटा परीसरातुन एक वर्षांपासून गायब झाला होता.व त्याच्या गावी दहा ते बारा वेळा पोलीसांणी जाऊन तपास केला असता तो मिळत नव्हता. दरम्यान संशयित आरोपी हा अहमदनगर जिल्ह्यातील एम.आय.डी.सी या ठिकाणी लपून रहात असल्याची माहीती खब-यांकडुन मिळाल्यानंतर पोलीसांणी वेषांतर करून जवळपास चार दिवस या ठिकाणी शोध घेतला असता आरोपी दारू पिण्यासाठी एम.आय.डी.सी. परीसरातील देशी दारूच्या दुकानावर आल्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली असुन या आरोपीस पोलीसांणी अटक केली आहे.

ही कामगिरी करत असताणा पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डाॅ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे,उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांणी दिलेल्या सूचनांनुसार पोलीस हवालदार विनोद गायकवाड,भिमा लोंढे,लहानु बांगर,अमित वाळुंजे यांणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT