क्राईम लोगो 
अहिल्यानगर

खुंटेफळच्या अल्पवयीन मुलाच्या हत्येचे गूढ उकलले

सचिन सातपुते

शेवगाव : शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ येथे तीन दिवसांपूर्वी झालेल्या अकरा वर्षीय मुलाच्या हत्येचा तपास लावण्यात शेवगाव पोलिसांना यश आले आहे. गावातील एका अल्पवयीन मुलानेच ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी संबंधित अल्पवयीन मुलास ताब्यात घेवून श्रीरामपूर येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

खुंटेफळ ता. शेवगाव येथे (ता. 10 मे) सार्थक अंबादास शेळके या अकरा वर्षीय मुलाची त्याच्या राहत्या घरात हत्या झाली होती. विळीच्या साह्याने गळा चिरून क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. (Police arrested one person in the Khuntephal case)

या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यामुळे या हत्याकांडाचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते. हत्येमधील मारेकरी अज्ञात असल्याने पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे, विश्वास पावरा, मिथुन घुगे, पोलिस उपनिरिक्षक सोपान गोरे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन दिवस तपास केला.

चौकशीसाठी चार ते पाच संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यात त्यांना काही माहिती समोर आली.

बालसुधारगृहात पाठवले

गावातील एक सतरा वर्षाच्या मुलाने आपली चोरी उघड होऊ नये म्हणून त्याने सार्थकला संपले. तो शेळके यांच्या घरात चोरी करीत होता. ते सार्थकने पाहिले पाहिले होते. त्या अल्पवयीन मुलास चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने खुनाची कबुली दिली. त्या अल्पवयीन आरोपीस श्रीरामपूर येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.(Police arrested one person in the Khuntephal case)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nobel Prize 2026: फ्रान्सिस हॅल्झेन यांना भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर; अशक्य वाटणाऱ्या कल्पनेला वास्तवात आणलं...

रस्ते, शाळा सगळंच बदललं! आता कसं दिसतं 'जत्रा' सिनेमातलं 'ह्यालागाड त्यालागाड' गाव? कुठे झालेलं शूटिंग, पाहा फोटो

रक्षाबंधन आणि कसाब! उज्ज्वल निकम यांनी सांगितली मटन बिर्याणी मागची खरी स्टोरी..

Snake Bite : जीवघेण्या सर्पदंशात बरे होण्‍याचे प्रमाण सर्वाधिक; सर्पदंश झालेल्या ९९ टक्के रुग्णांचे उपचारांनी वाचले प्राण

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! मेट्रो डब्यांची संख्या वाढणार, घाटकोपर-वर्सोवादरम्यान सहा डब्यांची ट्रेन धावणार

SCROLL FOR NEXT