alcoholics  
अहिल्यानगर

भंडारदरा परिसरात मद्यपींचा धुडगूस; २० जणांवर गुन्हे दाखल

सकाळ डिजिटल टीम

अकोले (जि. नगर) : तालुक्यातील मुळा, भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. परिसरातील सात जलाशये तुडुंब भरली आहेत, तर नेकलेस, नाणी फॉल, रंधा धबधबे कोसळू लागले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. मात्र काही पर्यटक या परिसरात धुडघूस घालत असून, आतापर्यंत पोलिसांनी २० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकारामुळे सहपरिवार पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे. (police cases have been registered against 20 alcoholics in Bhandardara area)

भंडारदरा परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने निसर्ग बहरला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. मात्र काही पर्यटक मद्यपान करून धुडगूस घालत आहेत. त्याचा सहपरिवारासह पर्यटनास येणाऱ्यांना त्रास होत आहे. त्याची दखल घेत राजूर पोलिसांनी आतापर्यंत २० तरुणांवर गुन्हे दाखल केले आहेत. कमी पोलिस बळ व वनविभागाचे होणारे दुर्लक्ष यामुळे या प्रकारांत वाढ होत आहे. अशा प्रकारांमुळे काही तरुणांना आपला जीवही गमवावा लागलेला आहे.

मद्यपींच्या या धुडगुसामुळे आदिवासी संघटनांनी एकत्र येत यापुढे मद्यपान करून धिंगाणा घालणाऱ्यांचा गावातच बंदोबस्त करून, त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल, असा इशारा दिला आहे. याबाबत राजूर पोलिस, तहसीलदारांना स्थानिक सरपंच व आदिवासी विकास परिषदेचे पांडुरंग खाडे, विजय भांगरे, सुनील सारुक्ते, संपत झडे आदींनी निवेदन दिले आहे.

(police cases have been registered against 20 alcoholics in Bhandardara area)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT