To the police at the checkpost Beating 
अहिल्यानगर

गाडी अडवल्याने पोलिसाला चेकपोस्टवर मारहाण

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव ः तालुक्‍यातील येसगाव येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिस हवालदाराला मोटारीतून जाणाऱ्या एकाने मारहाण करत गोळी घालून ठार मारण्याची धमकी दिली. काल (शुक्रवार) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. हवालदार विजय अर्जुन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी आरोपी संतोष पुंडलिक सोनवणे (रा. खिर्डी गणेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे, की तालुक्‍यातील येसगाव येथील चेकपोस्टवर पोलिस निरीक्षक सचिन इंगळे यांच्यासह पथक कार्यरत होते. रात्री अकराच्या सुमारास एक मोटर (एमएच 14 एएक्‍स 1888) येवल्याकडून कोपरगावकडे येताना दिसली. त्यातून संतोष सोनवणे आरडाओरड करीत काठी घेऊन खाली उतरले. त्यांनी माझ्या शर्टची कॉलर पकडली होती.

"कशाला गाड्या अडवता? दोन महिन्यांपासून तुम्ही फार मजा करत आहात,' असे म्हणत माझ्या डाव्या पायाला काठीने फटका मारला. माझ्याकडे बंदूक असून गोळी घालून तुला ठार मारीन, अशी धमकी दिली. पोलिसांनी आरोपीसह गाडी ताब्यात घेतली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT