The police got the right shelter because of Rohit Pawar 
अहिल्यानगर

पोलिसांना रोहित पवारांमुळे मिळाला हक्काचा निवारा, गृहमंत्री आज कर्जतला

वसंत सानप

कर्जत-जामखेड : कर्जत आणि जामखेड तालुक्यातील पोलिसांना अद्ययावत घरे मिळणार आहेत. ही आमदार रोहित पवार यांची देणगी आहे. या कामाचा गुरुवारी (ता:4 रोजी) गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.

यावेळी कोनशिलेचे अनावरण केले जाणार आहे. दोन्ही ठिकाणच्या वसाहतीमध्ये अधिकाऱ्यांसाठी प्रत्येकी दोन तर पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी 36 अशी 74 निवासस्थाने होणार आहेत . याकरिता तब्बल पंधरा कोटीहून अधिक रक्कम खर्च येणार आहे.

कर्जत-जामखेड या दोन्ही ठिकाणी पोलीस ठाणे असून कर्जतला उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्याच्या ठिकाणी पोलिसांचे संख्याबळ दीडशेच्या घरात आहे. या सर्वांना राहण्यासाठी पोलीस वसाहत होती. मात्र, ही वसाहत मोडकळीस आलेली आहे. त्यामुळे येथे राहणे म्हणजे जीव मुठीत धरून असुरक्षित जीवन जगणे असेच झाले होते.

यामुळे अनेक पोलीस बांधव तसेच अधिकारी कुटुंबीयांसह खाजगी जागेत भाड्याने राहत असत. मात्र पोलिसा कुटुंबीयां करिता अत्याधुनिक सुविधा असणारी वसाहत असावी. चांगली निवासस्थाने असावीत. त्यांना सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात; अशी सातत्याने मागणी होत होती.  

अखेर  यासंदर्भात  आमदार रोहित पवार  यांनी  गृहखात्याकडे  पाठपुरावा केला. ही बाब संबंधितांच्या निदर्शनास आणून दिली.  येथील पोलीस बांधवांसाठी तब्बल पंधरा कोटी रुपयांच्या खर्चाची अत्याधुनिक सुविधांसह उपलब्ध असणारी वसाहत उभी करण्याच्या प्रस्तावाला 'हिरवा कंदील' मिळविला.

या कामाचा शुभारंभ गुरुवार (ता:04) रोजी  गृहराज्यमंत्री  शंभूराजे देसाई  यांच्या हस्ते  होत असून  यानिमित्ताने  पोलीस दलातील  उपविभागीय; जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. कर्जत येथील कार्यक्रम सकाळी 11 वाजता तर जामखेड येथील कार्यक्रम दुपारी साडेबारा वाजता होणार आहेणार आहे.
 
चांगले अधिकारी मिळाले!
कर्जत-जामखेडला अण्णासाहेब जाधव हे पोलिस उपअधीक्षक म्हणून तर पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड जामखेडला तर चंद्रशेखर यादव हे कर्जतला पोलिस निरीक्षक म्हणून मिळाले आहेत. हे तिन्ही अधिकारी आपल्या प्रभावी कामासाठी 'माहीर आहेत. त्यांनी हजर होताच स्वतःच्या कामाची 'झलक' दाखविली आहे. एकीकडे चांगले अधिकारी मिळाल्याचा पोलिसांना आनंद आहे. आता पोलिसांसाठी चांगले निवासस्थाने मिळणार आहेत, हे आनंद द्विगुणित करणारे ठरते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT