Police have taken action against illegal sand mining in Shrirampur 
अहिल्यानगर

अवैध वाळूउपशावर पोलिसांची कारवाई; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्‍यातील मातुलठाण परिसरातील गोदावरी नदीपात्रात छापा घालून पोलिसांनी वाळूउपसा करणारे दोन पोकलेन, एक बुलडोझर, ट्रकसह एक मोबाईल व चार ब्रास वाळू, असा एक कोटी 83 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

सुनीलकुमार महतो (वय 24, रा. धोडा वस्ती, ता. बेरमो, झारखंड), मनजितसिंग धुप्पड (रा. आनंदवली, जि. नाशिक), अंजनी विश्वकर्मा (वय 24, रा. राजोहा, ता. बहरी, जि. सिधी, मध्य प्रदेश), युवराजसिंग भंडारी (वय 40, रा. डी. जी. बागेसर, जि. डेहराडून) व रवी धुप्पड (रा. श्रीरामपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
 
मातुलठाण शिवारातील नदीपात्रात पोकलेनद्वारे अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तालुका पोलिस पथकाने तातडीने नदीपात्रात जाऊन मध्यरात्री दोनच्या सुमारास छापा घालून ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Insurance: लहान फॉर्म अन् मोठा फायदा! PF खात्यातील या फॉर्मने कुटुंबाला मिळू शकतात 7 लाख रुपये

Hasan Mushrif Kolhapur ZP Political Strategy : बहुमत असूनही पेच? पण मुश्रीफांनी करून दाखवलं 'अशक्य ते शक्य'; कसं जुळवलं सत्तेचं समीकरण? वाचा सविस्तर...

Latest Marathi News Live Update : बारामतीत युगेंद्र पवारांनी साजरा केला गुढीपाडवा; “मिस यू अजित काका” म्हणत केली भावनिक पोस्ट

Thane politics: राजकीय खळबळ! ‘उबाठा’चे चार नगरसेवक शिंदे गटात; मध्यरात्री ठाण्यात पक्षप्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या हाती ‘धनुष्यबाण’

Crime News : बॅनरवर फोटो खाली का? नाशिकमध्ये नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून रात्रभर डांबले

SCROLL FOR NEXT