Ahmednagar crime news 
अहिल्यानगर

Ahmednagar Crime: कुंटणखाना चालविणाऱ्या हॉटेलवर छापा! पीडित तरुणीची सुटका; पाच आरोपींवर गुन्हा

सकाळ डिजिटल टीम

Ahmednagar Crime : केडगाव बायपास रोडवरील हॉटेल राधेश्याम या ठिकाणी सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात दोघांना अटक करून एका परराज्यातील तरूणीची सुटका करण्यात आली आहे.

केडगाव बायपास रोडवरील हॉटेल राधेश्याम येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली.

त्यांच्या पथाकाने तत्काळ हॉटेल राधेश्याम येथे बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला असता हॉटेलच्या तळघरातील एका खोलीत वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले. (Latest Marathi News)

त्या ठिकाणी हजर असलेल्या दोघांना नावे विचारली असता आकाश सुभाष गायकवाड (वय २४, रा. भिंगारदिवेमळा, झोपडी कँटीन, अहमदनगर), शहानवाज वहाब हुसेन (वय २१, रा. तपोवन, अहमदनगर) असे सांगितले.

तसेच, हॉटेल मालक सुरज (पुर्ण नाव माहित नाही) यांच्या सांगण्यावरून ग्राहकांकडून पैसे घेवून त्यांना रुम उपलब्ध करुन देऊन महिलेकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची कबुली दिली.

या कारवाईत ३३ हजार २३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार गणेश धोत्रे यांच्या फिर्यादीवरुन अनैतिक व्यापारास प्रतिबंध सन १९५९ चे कलम ३, ४, ५, ७, ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव करीत आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT