अहिल्यानगर

पोलिसांनी उतरविली तळीरामांची झिंग! १५० जणांवर कारवाई; ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची मोहीम, ठोठावला इतक्या हजारांचा दंड

नववर्षाचे स्वागत करताना अतिउत्साहाच्या भरात दारुच्या नशेत वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली.

सकाळ डिजिटल टीम

Ahmednagar News: नववर्षाचे स्वागत करताना अतिउत्साहाच्या भरात दारुच्या नशेत वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. दारुच्या नशेत वाहन चालविणाऱ्या सुमारे १५० वाहनचालकांची झिंग पोलिसांनी उतरविली. त्यामुळे वर्षाचा शेवट करताना नशेत वाहन चालविणे चांगलेच महागात पडले.

नववर्षाच्या पार्श्र्वभूमिवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची मोहीम राबविण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिले होते. मद्यधुंद होऊन गाड्या चालवणारे सुमारे १५० चालक पोलिसांनी लावलेल्या नाकांबदीत अडकले. कारवाई झालेल्यापैंकी सर्वाधिक तळीराम कोतवाली, एमआयडीसी, नगर तालुका, शेवगाव, अकोले, राहाता, संगमनेर शहर, जामखेड, शनिशिंगणापूर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत आढळले.

नशेत वाहन चालविल्याने चालकाच्या व इतरांच्या जीवाला धोका निर्माण होतो, त्यामुळे ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री वाहने मद्यधुंद अवस्थेत चालवू नयेत, अशा सूचना पोलिस प्रशासनाने केल्या होत्या. मात्र, सूचनांकडे दुर्लक्ष करत अनेकांनी नशा करून वाहने चालविली. पोलिसांनी कारवाई करत चाळीस हजार रुपयांचा दंड वसूल करत संबंधितांवर गुन्हे दाखल केले.

महत्त्वाच्या ठिकाणांवर नाकाबंदी

माळीवाडा बसस्थानक परिसर, केडगाव बायपास, कायनेटिक चौक, कल्याण बायपास, अरणगाव बायपास आदी ठिकाणांसह जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्वच महामार्गावर पोलिसांनी नाकाबंदी करून कारवाई केली.

चाचणीसाठी थेट रुग्णालयात

मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकांची रुग्णालयात चाचणी करण्यात आली. काही ठिकाणी पोलिसांसोबत मद्यपान केलेल्या वाहनचालकांनी हुज्जतही घातली. मात्र, संबंधितांची थेट रुग्णालयात नेऊन चाचणी करण्यात आली. रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT