Ahmednagar ZP Sakal
अहिल्यानगर

आरक्षणावर ठरणार राजकीय गणिते

प्रारूप आराखडा २७ जूनला अंतिम होणार

दौलत झावरे

अहमदनगर - आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी गट-गणांचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाला आहे. तो २७ जूनला अंतिम होणार आहे. त्यानंतर आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या आरक्षणानंतरच राजकीय गणिते ठरणार आहेत. अनेकांनी तयारी केलेली असली, तरी आरक्षण काय निघते, यावरच त्यांची पुढील धोरणे राहणार आहेत.

जिल्हा परिषदेचे ८५ गट व पंचायत समितीच्या १७० गणांचा प्रारूप आराखडा गुरुवारी जाहीर झाला आहे. त्यावर आता हरकती मागविण्यात आल्या असून, त्यावरील कार्यवाहीनंतर २७ जूनला अंतिम आराखडा प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यानंतर आरक्षण सोडत होणार आहे. सध्या कोणता गट अन् कोणता गण राहतो, याची उत्सुकता होती. ती उत्सुकता संपली आहे. आता सर्वांना आरक्षणाचे वेध लागले आहेत. या आरक्षण सोडतीनंतरच कोण कोणत्या गटातून अन् गणातून निवडणूक लढविणार, हे स्पष्ट होणार आहे.

जिल्हा परिषदेत मागील पंचवार्षिक निवडणुकीत कॉँग्रेस २३, राष्ट्रवादी १९, भाजप १४, शिवसेना ७, शेतकरी क्रांतिकारी पक्ष ५, श्रीरामपूर आघाडी २, अपक्ष हर्षदा काकडे १, भाकप १, अन्य अपक्ष १, असे बलाबल आहे. जिल्हा परिषदेचे ८५ गट व पंचायत समितीच्या १७० गण असल्यामुळे सर्वच पक्षांना आता जागा वाढविण्याची संधी राहणार आहे. विखे सध्या भाजपमध्ये असल्यामुळे आता भाजपची ताकद वाढणार आहे. तसेच मंत्री शंकरराव गडाख यांच्यामुळेही आता शिवसेनेची ताकद वाढलेली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे जिल्ह्यात सर्वाधिक सहा आमदार आहेत. त्याचा सर्वाधिक फायदाही त्यांना होणार आहे. भाजप सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आगामी निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांबरोबरच मनसे, आरपीआय, वंचित बहुजन आघाडी हे पक्षही उतरण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Khan Death Claim : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू ? पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

मला आजही महागड्याच.... मोहसीनने दुसऱ्या पत्नीसोबत फोटो शेअर करताच उर्मिला मातोंडकरने मारला टोमणा; पोस्ट करत म्हणाली

Tata Sons N Chandrasekaran : टाटा समूहाला मोठा धक्का? चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याच्या बातमीने शेअर्स गडगडले, TCS मध्ये मोठी घसरण

Sri Lanka squad for 1st Test vs India: विजय आपलाच... भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून श्रीलंकेच्या दोन स्टार खेळाडूंची माघार; १५ सदस्यीय संघ जाहीर

हातात पिशव्या, पायात चप्पलही नाही... लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी चक्क कंडक्टरसोबत पळाली; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT