अहिल्यानगर

शेवगावात नगरपालिका कामगारांसाठी आंदोलन करणाऱ्यांना अटक

सचिन सातपुते

शेवगाव : नगरपालिका कामगारांच्या थकीत वेतनाच्या मागणीसाठी आमदार मोनिका राजळे यांच्या कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलनासाठी निघालेल्या विविध संघटना व पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी आखेगाव रस्त्यावरच अडविले. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी (स्व.) गोपीनाथ मुंडे चौकात थाळीनाद आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी वंचित बहुजन आघाडी, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. काही वेळाने त्यांना सोडण्यात आले. 

नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन चार महिन्यांपासून थकल्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव किसन चव्हाण, प्यारेलाल शेख, मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रेय फुंदे, प्रशांत भराट, बाळासाहेब फटांगरे यांच्या नेतृत्वाखाली चार दिवसांपासून नगरपरिषद कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांसह वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येत आहे.

या बाबत मंगळवारी झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यामुळे काल (बुधवार) सर्व संघटना व कामगारांनी आमदार मोनिका राजळे यांच्या कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज सकाळी हे सर्व जण आखेगाव रस्त्यावरील त्यांच्या कार्यालयाकडे घोषणा देत निघाले तेव्हा पोलिसांनी त्यांना (स्व.) गोपीनाथ मुंडे चौकात अडवून पुढे जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे संतप्त मोर्चेकऱ्यांनी तेथेच थाळीनाद आंदोलन केले.

पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या, आंदोलन थांबविण्याच्या विनंतीस आंदोलकांनी नकार दिल्याने पोलिसांनी त्यांना ठाण्यात नेले. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Bushra Bano IPS? : 'अस्सलाम-अलैकुम' म्हटल्यामुळे IPS अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली? बंगालमधील 'त्या' व्हिडिओवरून गदारोळ

Fact Check : विराट कोहली २०२७ चा वन डे वर्ल्ड कप इंग्लंडसाठी खेळणार? भारतीय क्रिकेटला हादरवून टाकणाऱ्या वृत्तामागचे सत्य

Tata News: चंद्रशेखरन यांचा U-Turn? पुन्हा Tata चेअरमनपदी निवड! निर्णय होताच शेअर्स 5% वाढले; नेमकं काय घडलं?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमवर दुःखाचा डोंगर; लेखकाचं अकस्मात निधन, सचिन गोस्वामींची भावुक श्रद्धांजली

UPI MDR 2026 : अमेरिकेच्या दबावामुळे युपीआय वर एमडीआर? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण; जाणून घ्या नेमकं प्रकरण

SCROLL FOR NEXT