

Is UPI MDR Linked to US Pressure?
esakal
युपीआय व्यवहारांवरील नव्या मर्चंट डिस्काउंट रेटवरून (MDR) देशात राजकीय आणि आर्थिक चर्चा सुरू झाली आहे. काही विरोधी पक्षांनी हा निर्णय अमेरिकेच्या दबावाखाली घेण्यात आल्याचा आरोप केला आहे. मात्र, केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसने (DFS) हा दावा फेटाळून लावत युपीआय संदर्भातील धोरणात्मक निर्णय भारत स्वतंत्रपणे घेत असल्याचे स्पष्ट केले आहे.