pomegranates grown by farmers in nevase were exported to gulf countries
pomegranates grown by farmers in nevase were exported to gulf countries Sakal
अहमदनगर

आखातात पोचली नेवाशाची डाळिंबे; उच्चशिक्षित शेतकऱ्याचा प्रयोग

सुनील गर्जे

नेवासे (जि. अहमदनगर) : तालुक्यातील सुलतानपूर येथील विजय भानुदास देशमुख अकरा वर्षांपासून डाळिंबाचे पीक घेत आहेत. सर्वसाधारण परिस्थिती असलेल्या देशमुख यांनी प्रतिकूल परिस्थितीतून दर्जेदार डाळिंब उत्पादन घेत आर्थिक सुबत्ता साधली. सध्या त्यांच्याकडील ३० एकर क्षेत्रावर डाळिंबाची १० हजार झाडे आहेत. त्यातील १५ एकर क्षेत्रावर दोन वर्षांपूर्वी लागवड केली आहे. सध्या १५ एकरांवरील पीक हाती येत असून, डाळिंबाची व्यापाऱ्यामार्फत निर्यात झाली आहे.


कुकाणे परिसर तसा बागायती. मुळा कालव्यातून या भागाला पाणी मिळते. उसासह फळपिके घेण्यावर त्यामुळे शेतकऱ्यांचा कल असतो. उच्चशिक्षित देशमुख यांना पंधरा एकर शेती. नोकरीच्या मागे न लागता देशमुख यांनी शेती करण्यावर भर दिला. कांदा, ऊस, केळी यांसारखी पिके घेतली. २०१० साली त्यांनी सात एकर क्षेत्रावर भगवा जातीच्या डाळिंबाची लागवड केली. त्यातून मिळणाऱ्या पैशातून टप्प्याटप्प्याने जमीन क्षेत्रात वाढ केली. आज देशमुख यांच्याकडे एकूण ४८ एकर जमीन क्षेत्र झाले. त्यातील तीस एकरांवर डाळिंब आहे. त्यांना प्रतिकिलो १११ रुपयांचा दर मिळाला. २०१३ साली पाच एकरांवर संत्र्याची लागवड केली. पीक हाती आल्यानंतर व्यापाऱ्यांना जागेवरच संत्र्यांची विक्री करतात.


सुलतानपूर येथील सात एकरांत डाळिंबाची लागवड केल्यानंतर तीन वर्षांनी पीक हाती आले. सहा वर्षांच्या परिश्रमातून आर्थिक सुबत्ता आल्यानंतर नजीक चिंचोलीत (ता. नेवासे) पहिल्यांदा साडेपंधराव व पंधरा एकर माळरान खरेदी केले. सध्या ३० एकर क्षेत्रावर डाळिंब असून, त्यातील १५ एकरांवरील फळे काढणीचे काम सुरू आहे. यंदा पाच एकर क्षेत्रावरील डाळिंबाची व्यापाऱ्यामार्फत बांगालादेश, आखाती राष्ट्रात देशात निर्यात झाली आहे.


शेततळ्यातून पाणी उपलब्धता

सुलतानपूर परिसरात पाणी उपलब्ध होत असले, तरी देशमुख यांनी एक कोटी लिटर क्षमतेची दोन शेततळी तयार केली आहेत. शेततळ्यांसाठी त्यांनी चार एकर क्षेत्र सोडले आहे. तसेच विजेची समस्या भेडसावू नये, यासाठी त्यांनी स्वखर्चाने शेतात स्वतंत्र रोहित्र बसवले आहे.

शेतकऱ्यांना डाळिंब पीक कायम फायदेशीर ठरले आहे. डाळिंबावर पडणाऱ्या विविध रोगांचा व नैसर्गीक आपत्तीचा अभ्यास करुन व्यवस्थापन ठेवले, तर पीक फायदेशीरच ठरते, हा माझा अनुभव आहे.
- विजय देशमुख, प्रयोगशील शेतकरी, सुलतानपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT