Prachi Tathe
Prachi Tathe Sakal
अहमदनगर

वडिलांच्या निधनाचे दुःख बाजूला सारत दिला पेपर

सकाळ वृत्तसेवा

मुलीची दहावीची परीक्षा सुरू असताना अचानक काळाने वडिलांवर घाला घातला. पितृछत्र हिरावल्याने मुलीसह कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

अहमदनगर - मुलीची दहावीची परीक्षा (SSC Eaxm) सुरू असताना अचानक काळाने वडिलांवर घाला घातला. पितृछत्र हिरावल्याने मुलीसह कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखातून सावरण्यासाठी शिक्षकांनी (Teacher) मुलीला धीर दिला. वडिलांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर प्राची ताठे (Prachi Tathe) हिने सोमवारी (ता. ४) दहावीचा पेपर दिला.

अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भिंगार हायस्कूलमध्ये प्राची संदीप ताठे (रा. भिंगार, ताठे मळा) शिक्षण घेत आहे. वडील संदीप ताठे (वय ४०) यांचे रात्री निधन झाले. ताठे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. ताठे यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर सर्व कुटुंबीय घरी आले. या दुर्दैवी घटनेची माहिती शाळेतील शिक्षकांना समजली. त्यानंतर प्राचार्य राजेंद्र बेद्रे यांनी वर्गशिक्षक ए. ए. पाठक, क्रीडाशिक्षक यू. पी. शिंदे यांना प्राचीच्या घरी पाठविले. त्यांनी प्राचीचे सांत्वन केले. सुरवातीला परीक्षेला बसण्यास ती तयार होत नव्हती. शिक्षकांनी होणाऱ्‌या नुकसानीबाबत समजावून सांगत तिला परीक्षेस बसण्यासाठी प्रवृत्त केले. अखेर दुःख बाजूला सारत तिने पेन हातात घेत भूगोल विषयाचा पेपर लिहिला.

प्राची हिच्या जीवनातील हा दुःखद प्रसंग होता. आज तिचा दहावीच्या पेपर होता. मी व माझे सहकारी तिच्या घरी गेलो. परीक्षेला बसण्यासाठी तिच्या पालकांशी चर्चा केली. शिक्षणाचे महत्त्व ओळखून, अंत्यविधीनंतर त्यांनी प्राचीला परीक्षेला पाठविले. तिच्या धैर्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

- ए. ए. पाठक, वर्गशिक्षक

यांनी घेतले परिश्रम

उपप्राचार्य आर. बी. लोंढे, पर्यवेक्षक बी. ए. भालसिंग, जी. ए. भावे, वर्गशिक्षक ए. ए. पाठक, क्रीडाशिक्षक यू. पी. शिंदे यांनी प्राचीचे मनपरिवर्तन करून पेपर लिहिण्यासाठी तिला प्रवृत्त केले.

- राजेंद्र बेद्रे, प्राचार्य, भिंगार हायस्कूल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT