प्राजक्त तनपुरे  प्राजक्त तनपुरे
अहिल्यानगर

भाजपवाल्यांनी नाटके बंद करावेत; विखेंच्या टीकेला प्रत्युत्तर

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : काही लोक निवांत झोप येण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये गेले आणि असेच लोक आता इतरांच्या बॅलन्सशीटबाबत बोलत आहेत, अशा शब्दात नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या टीकेला मंत्री तनपुरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिला आहे.

तनपुरे यांनी नगर तालुक्‍यातील विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी, या मागणीसाठी भाजपच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते.

याप्रसंगी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत, असा आरोप केला होता. पालकमंत्री हसन मुश्रीफ हे सध्या त्यांचे बॅलन्स शीट तपासण्यात व्यस्त आहेत, त्यांना ते तपासू द्यात. त्यानंतर ते जिल्ह्यात येतील, अशी टीका त्यांनी केली होती. त्यावर तनपुरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे काम अत्यंत चांगले असून, त्यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे, असेही ते म्हणाले.

भाजपने आंदोलनाचा फार्स बंद करावा. आदल्या दिवशी राज्य सरकारने शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आणि दुसऱ्या दिवशी भाजपच्यावतीने उपोषण करण्यात आले. भाजपवाले हे सकाळी नाष्टा करून आले आणि दुपारी जेवण करायाला घरी निघून गेले. उपोषण करायचं, निदान लोकभावनेचा आदर करून तरी भाजपने उपोषण करायला हवं होतं, अशा शब्दात मंत्री तनपुरे यांनी भाजपच्या उपोषण आंदोलनाची खिल्ली उडवली. टीका करणाऱ्यांनी नगर-मनमाड महामार्गाला निधी आणून काम करून दाखवावे, असेही ते म्हणाले.

केंद्राकडून महावितरणच्या खासगीकरणाचा डाव

केंद्र सरकारकडून महावितरणचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती माझ्या कानावर आली आहे, मात्र असे झाले तर शेतकरी आणि सर्वसामान्यांकडून वीज बिल वसुली वेगाने केली जाईल. सध्या वसुलीसाठी खूप सक्ती केली जात नाही. महावितरणचे खासगीकरण झाले, तर सर्वात जास्त नुकसान सर्वसामान्यांचेच होईल. त्यामुळे महावितरणचे काम अतिशय उत्तम सुरू आहे. नागरिकांनी देखील वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकाऱ्यांचे नियमानुसार लॉकडाऊन

जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन केल्याबाबत काही नेत्यांनी आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप केला होता. जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देण्यात आलेल्या अधिकारांनुसार त्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. यात कोणतेही राजकारण नाही, असे तनपुरे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, चार जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT