प्राजक्त तनपुरे  Sakal
अहिल्यानगर

शेतकऱ्यांना पुर्वीप्रमाणेच जमिनीचा मोबदला मिळेल : मंत्री तनपुरे

विलास कुलकर्णी

,

राहुरी (जि. अहमदनगर) : "सुरत-हैदराबाद ग्रीनफिल्ड महामार्गासाठी लवकरच भूमी अधिग्रहण प्रक्रिया सुरू होणार असल्याचे समजते, त्यासाठी राज्य शासनाचा भूमी अधिग्रहणाचा सहा ऑक्टोबर २०२१ रोजीचा नवीन शासननिर्णय लागू नसेल. पूर्वीच्या अधिसूचनेनुसार मूल्यांकन होईल. महामार्गासाठी जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी चिंता करू नये. त्यांना पूर्वीच्या मूल्यांकनानुसार मोबदल्याची रक्कम मिळेल." असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आज (सायंकाळी) मुंबई येथून ऑनलाईन पत्रकार परिषदेत मंत्री तनपुरे बोलत होते. ते म्हणाले, "सुरत-हैदराबाद ग्रीनफिल्ड महामार्ग नगर जिल्ह्यातून ११० किलोमीटर जात आहे. त्यात, राहुरी विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक गावांचा समावेश आहे. त्यामुळे, महामार्गासाठी भूमी अधिग्रहित होणाऱ्या शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ मला भेटले. त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले."

"राज्य शासनाच्या सहा ऑक्टोबर रोजीच्या नवीन शासन निर्णयानुसार भूमी अधिग्रहण मोबदला रकमेची परिगणना करतांना गुणन घटक १.० राहतील. असा उल्लेख आहे. पूर्वी तो २.० होता. त्यामुळे, शेतकऱ्यांची बेचैनी वाढली. मोबदल्याची निम्मी रक्कमच मिळेल. असा समज शेतकऱ्यांमध्ये पसरला. त्यामुळे, शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत."

त्याविषयी मुंबई येथे आज (मंगळवारी) महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार सहा ऑक्टोबरचा शासन निर्णय नवीन महामार्गाच्या भूमी अधिग्रहणासाठी लागू होत नाही. नवीन शासन निर्णयाची अधिसूचना जुन्या महामार्गालगत असलेल्या कृषक व कृषक जमिनींच्या अधिग्रहणासाठी आहे. त्यामुळे, पूर्वीच्या अधिनियमानुसार गुणन घटक २.० नुसार मूल्यांकन करुन, मोबदला दिला जाणार आहे. त्यामुळे, संदिग्ध शेतकऱ्यांनी चिंता करू नये." असे आवाहन मंत्री तनपुरे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांसाठी तनपुरे-विखे एकत्र…

अस्तित्वातील महामार्गालगत जमिनी अधिग्रहीत करतांना अकृषक जमिनींसाठी जास्त पैसे मोजावे लागतात. अशी केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांची धारणा आहे. तसे त्यांनी जाहीररित्या बोलून दाखविले आहे. महाराष्ट्रातील जुन्या महामार्गांची कामे मार्गी लागावीत. यासाठी राज्य शासनाने सहा ऑक्टोबरचा नवीन शासन निर्णय काढला आहे. माझा व खासदार डॉ. सुजय विखे यांचा पक्ष वेगळा असला. तरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही दोघेही एकत्र आहोत. असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात मोठा बदल? पेन्शनधारकांना मिळू शकते ४५ हजारांची किमान पेन्शन

Pune Stunt Video : पुण्यात परप्रांतीय तरुणांचा मध्यरात्री धिंगाणा, दारूच्या नशेत भरधाव कारमधून जीवघेणी स्टंटबाजी अन्... व्हिडिओ व्हायरल

CIDCO Housing Lottery: स्वातंत्र्य दिनानिमित्त ४,७७९ घरांची लॉटरी सिडकोची 'ईडब्ल्यूएस'साठी संधी

Hardik Pandya Trade: मोठा ट्विस्ट! Mumbai Indians च्या हार्दिकला पुन्हा गुजरात टायटन्सकडे जायचंय, कर्णधार व्हायचंय; शुभमन गिलचं काय होणार?

Marathi News Live Updates : श्रावणात त्र्यंबकेश्वरचे व्हीआयपी दर्शन बंद

SCROLL FOR NEXT