Prayers of all party leaders for the health of Sadaanna Pachpute 
अहिल्यानगर

सदाअण्णा पाचपुतेंच्या आरोग्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची प्रार्थना

संजय आ. काटे

श्रीगोंदे : काष्टी गटातील जिल्हा परिषद सदस्य व आमदार बबनराव पाचपुते यांचे बंधू सदाशिव पाचपुते यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्यांच्या आरोग्यासाठी काष्टीसह तालुक्‍यातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी प्रार्थना सुरू केली आहे. ते आजारातून लवकर बरे व्हावेत, यासाठी मंदिरात महाआरती व घंटानाद सुरू झाले आहेत. 

आमदार पाचपुते यांचे राजकारण गेली 40 वर्षे सांभाळणारे सदाशिव पाचपुते यांचा तालुक्‍यासह जिल्ह्यात तगडा जनसंपर्क आहे. राजकारणातील "किंगमेकर' अशी त्यांची ओळख आहे.

अधिकाऱ्यांवर आदरयुक्त दरारा ठेवून सामान्यांची कामे मार्गी लावण्यात त्यांचा मोठा हातखंडा आहे. त्यामुळे सामान्यांसोबत त्यांचे नाते राजकारणापलीकडचे आहे. त्यांच्या आरोग्यासाठी काल सकाळी काष्टी येथील भैरवनाथ मंदिरात महाआरती करण्यात आली. सायंकाळी शहरातील शेख महंमद महाराज मंदिरात साकडे घालण्यात आले. अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT