president of the travel association Vijay Dhanwate demanded that the transport board should increase the number of buses in the Puntambe area 
अहिल्यानगर

कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने एसटी बस वाढविण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

पुणतांबे (अहमदनगर) : परिसरात कोरोनाबाधितांची संख्या सध्या घटली आहे. दिवाळी तोंडावर आल्याने प्रवाशांची संख्या मात्र वाढत आहे. त्यात पुरेशा एसटी बस उपलब्ध नसल्याने गैरसोय होत आहे. परिवहन मंडळाने या भागात बसची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजय धनवटे यांनी केली आहे. या प्रश्नात कोपरगाव, श्रीरामपूरच्या आगारप्रमुखांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
 
या भागातून कोपरगाव, श्रीरामपूर आगाराच्या बस धावतात. लॉकडाउनमुळे बंद असलेली एसटी बससेवा आता सुरळीत सुरू झाली आहे. मात्र, ठराविक मार्गांवरच बस धावत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. कोरोना रुग्णसंख्येत घट झाली, आठवडे बाजार सुरू झाले, दिवाळी सणामुळे रस्त्यांवर वर्दळ वाढली. मात्र, पूर्वी येथे येणारी मुक्काम बस अद्याप बंदच आहे. 

सकाळची शिर्डी- औरंगाबाद बस येत नाही. नऊनंतर बस धावण्यास सुरवात होते. त्यामुळे सकाळी लवकर जाणाऱ्या प्रवाशांना तिष्ठत थांबावे लागते. सणासुदीच्या काळासाठी जादा बसची गरज असल्याने त्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी केली आहे. 

संपादन : सुस्मिता वडतिले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: राज्य सरकारकडून भरती रद्द, स्टेनोग्राफर पद मृत घोषित; पुण्यात विद्यार्थी आक्रमक

Gold Rate Today: एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! आता एक तोळा सोन्यासाठी किती पैसे द्यावे लागणार? जाणून घ्या ताजे भाव

परप्रांतीय ट्रेनमध्ये, कन्फर्म तिकिटासह मराठी माणूस प्लॅटफॉर्मवर; TC, रेल्वे प्रशासन, पोलीस अन् सरकार सगळेच झोपेत

Latest Marathi News Live Update: फरार निदा खान प्रकरणाला नवा ट्विस्ट; मेडिकल सर्टिफिकेटमुळे तपासावर प्रश्नचिन्ह

KKR च्या २५ कोटीच्या खेळाडूने का केली नाही बॉलिंग? अजिंक्य रहाणेने दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाला, 'सामन्यावेळी त्याला....'

SCROLL FOR NEXT